ई- निविदा नियमांना बगल देणाऱ्या हिमायतनगरच्या स्वच्छता ठेकेदारावर कार्यवाही कधी होणार -NNL

तक्रार देऊनही कार्यवाही गुलदस्त्यात ठेऊन पुन्हा त्याचा ठेकेदारास कंत्राट देण्याची तयारी



हिमायतनगर| येथील नगरपंचायत अंतर्गत स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने ठेकेदारी घेताना भरून दिलेल्या ई -निविदेच्या कोणत्याही नियमांचे पालन केले नाही. उलट नियमांना बगल देत अल्प मनुष्यबळाकडून हाती तुराट्याच्या काड्या घेऊन थातुर माथूर सफाई करत शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान यांनी जिल्हाधिकारी  कार्यालयात तक्रार देऊन अनेक महिने उलटले. मात्र या तक्रारीची चौकशी गुलदस्त्यात ठेऊन उलट पुढील वर्षाचे कंत्राट त्याचा ठेकेदारास देण्याचा घाट रचला आहे. या प्रकारची चौकशी करून ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि मागील कामाची चौकशी करून दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केली आहे.

हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर शहरातील नागरिक सुविधेसह दुर्गंधीपासून मुक्ती मिळून शहर स्वच्छ सुंदर होईल अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र हि अपेक्षा धुळीस मिळाल्याचे दिसत आहे. यास नगरपंचायत प्रशासन सत्तेच्या माध्यमातून स्वहित साधण्यासाठी हजारो रुपयात होणाऱ्या हिमायतनगर शहराच्या स्वच्छतेचे कंत्राट तब्बल १५ लाखामध्ये देणाऱ्या लालची लोकांमुळे नागरी सुविधेसाठी उपलब्ध होणाऱ्या विविध विकास कामाच्या निधीची पुरती वाट लावली गेली आहे. 

याचे जिवंत उदाहरण १ कोटी रुपये खर्चाचा बोरगडी स्मशान भूमी नजीकचा रोड, १ कोटी १५ लाखाचा हुतात्मा शाळेमागील रोड, १ कोटी ३५ लाखाहून अधिक खर्च करून झालेला रेल्वे स्थानक रोड, यासह शहरात करण्यात आलेल्या अनेक गल्ली बोलतील रस्ते व नाल्याची बांधकाम यासाठी खर्च करण्यात आलेले रस्ते अल्पावधीतच धुळीस मिळाली आहेत. तर स्वच्छतेच्या काम कसे चांगले होणार, याचे चित्र दररोज शहरातील अनेक प्रभागातील तुंबलेल्या नाल्या, घाणीचे साम्राज्य, सफाई कर्मचारी झाडून गेले तरी त्या ठिकाणावर असलेला कचरा हे ठेकेदारच्या नाकर्तेपणाचा आणि अपुऱ्या मनुष्यबळाची पोल खोल करत आहे.

खरे पाहता कंत्राटदारास निविदा देताना एक फोन नाहीतर ५० च्या जवळपास नियम लादून स्वच्छेतेचे कंत्राट महिन्याला १५ लाखास दिले आहे. ५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत होती त्यावेळी ७० ते ९० हजारात शहराची स्वच्छता आजच्या पेक्षाही अधिक चांगली व्हायची. आजची शहराची वस्ती तीच, लोकसंख्या केवळ ५ टक्क्याने वाढली मात्र स्वच्छतेचा ठेका १४ पटीने वाढविल्या गेल्या यामागचे कारण काय..? हे शोधणे आमच्या सारख्याने तर होणे शक्य नाही. मात्र या कामात होणार हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा, नाकर्तेपणा आणि शुल्लक काम करून १५ लाखाचे देयके काढण्याच्या मागचे गमक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान यांनी शोधून काढले आहे. 

त्यामुळे हा प्रकार स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या पल्लवी इंटरप्रायजेसच्या नावाखाली आपली पोळी भाजून घेणारा संबंधित ठेकेदार आणि हिमायतनगर शहरातील सबठेकदाराच्या अंगलट येण्याची शक्यता वर्तवीली जात आहे. कारण ठेकेदाराने येथील एका कंत्राटदारास हाताशी धरून हा सव्वाच्छतेचा ठेका मिळविला आहे. म्हणे यासाठी मोठं -मोठ्या नेत्यांना, अधिकारी, कर्मचारी, वॉर्ड सदस्य आणि काही संघटनांना देखील महिन्याला वाटा दिला जातो. म्हणून शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडत असताना देखील ठेकेदारावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही असे चित्र सध्यातरी दिसत आहे.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी