नांदेड, हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरात भगवान श्री लक्ष्मी नृसिंह जयंती साधेपणाने साजरी -NNL



हिंगोली/नांदेड| दासरी माला दासरी समाज बांधवाचे आराध्य कुलदैवत असलेल्या भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी तथा हिंदूची जागृत देवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामीची जयंती दिनांक 25 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाउन च्या नियमाचे पालन करत अत्यंत साधेपणाने समाजबांधवानी साजरी केली असून, घरातच प्रतिमा पुजन करून भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी जयंती साजरी केली. 

तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यासह राज्यभरात जी दासरी माला दासरी समाज बांधवाची मंदिरे आहेत तिथे फक्त पुजारी नी पुजा केली. अशा प्रकारे कुठेही गर्दी न करता नियमाचे पालन करत, सोशल मीडियावरन आँनलाईन शुभेच्छा देत दासरी माला दासरी समाज बांधवानी आपल्या कुलदैवत भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी चा जन्मोत्सव हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात अत्यंत साधेपणाने साजरा केला. ह्यावेळी सर्वत्र नियमाचे पालन करण्यात आले आहे. 

भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामी जयंती निमित्त विश्वातील रोगराई नाहीशी होऊन कोरोनाचे संकट लवकरात लवकर टळावे. समस्त मानवजातीला कोरोना विरूध्द लढण्यासाठी बळ मिळावे ऊर्जा मिळावी, सर्व परिस्थिती पुर्वरत व्हावी, समस्त विश्वात शांती सुख समृद्धी उत्तम आरोग्य लाभावे, सहिष्णू वृत्ती ची कास धरत मानवसेवा हिच ईश्वर सेवा मानत, अखिल मानवजातीचे सर्व संकट, आपत्तीपासुन बचाव व्हावा, व भगवंताचा आशीर्वाद सदा रहावा. अशी लोककल्याणकारी मंगलमय विश्व प्रार्थना भगवान श्री लक्ष्मी नृसिंह स्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यात आली. अशी प्रतिक्रिया दासरी माला दासरी समाज युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.श्री.गंगाधर चेपूरवार ह्यांनी ह्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी