दरवर्षी हिमायतनगर शहरात मोठ्या हर्षोल्हासात प्रभूश्रीराम जयन्ती साजरी केली जाते. तसेच शहरातील मुख्य रस्त्याने भव्य रैली राम, सीता, लक्ष्मण, हनुमान अशी झांकी काढून शहरवासीयांचे लक्ष वेधले जायचं तसेच रक्तदान सारखे कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली जायची. तर येथील श्रीराम मंदिरात महिला मंडळींकडून भजन, श्रीरामस्रोत पठण करून रामजन्मोत्सव साजरा व्हायचा. यावेळी ठिकठिकाणी महाप्रसाद, रैलीचे सडा संमार्जन, रांगोळी व भगव्या पताका लावून स्वागत केले जात होते. मात्र यंदा कोरोना महामारीने उग्ररूप धारण केल्याने सण, उत्सव, मंदिर, मस्जिद आदींसह सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याने हिंदू धर्मियांना उत्सव आपापल्या घरी साजरा करावा लागतो आहे. तर युवकांना आपल्या आनंदावर पाणी फिरावे लागले आहे.
असे असले तरी आपली हिंदू धर्मची धार्मिक प्रथा पाहता आणि यंदा अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिर साकारले जात असल्याने उत्सव मोठ्या हर्षोल्हासात ना भूतो न भविष्यती असा कार्याचा या मानसिकतेत होते. मात्र दुसऱ्या लाटेतील वाढत्या कोरोनाच्या प्रसाराने हा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्या लोकांमध्ये साजरा करावा लागला आहे. हिमायतनगर शहरात प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव सोहळा कोरोना महामारीचे सोशल डिस्टन्स, मास्क, सैनिटायजर आदी सर्व नियम पाळून बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेच्या संयुक्त विद्यमाने अत्यन्त साध्या पद्धतीने श्री राम... जय राम... जय जय... राम च्या जयघोषात साजरा करून प्रभू श्रीराम प्रतिमेला विश्वहिंदू परिषदेचे प्रचारक श्यामजी रायेवार आणि माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
यावेळी विश्वहिंदू परिषदेचे प्रचारक श्यामजी रायेवार यांनी उपस्थित युवकांना मोदीजींनी सर्व हिंदू बांधवांच्या स्वप्नातील प्रभूश्रीराम मंदिराचे भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात केली. हि समस्त बांधवांसाठी आनंदाची आहे, परंत्तू कोरोनाने या आनंदाला आवरते घ्यावे लागते आहे. हिंदू बांधव शांत सय्यमी आहे, जर कोणी आमच्या आस्मितेला घाला घालण्याचा प्रयत्न करीत असले तर ते कदापि सहन केले जाणार नाही. अखेर आजघडीला राममंदिर साकारले जात आहे, यंदाची जयंती साध्या पद्धतीने झाली तरी कोरोनाचे संकट प्रभू श्रीरामाने दूर केल्यास पुढील वर्षी जल्लोषात श्रीरामनवमी साजरी करू असेही त्यांनी सांगितले. यावेळी बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल, भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान, खंडू चव्हाण, राम सूर्यवंशी, विपुल दंडेवाड, दुर्गेश मांडोजवार, सुधाकर चिट्टेवार, जितू सेवनकर, आदींसह शहरातील बजरंग दल, विश्वहिंदू परिषद, भाजप कार्यकर्ते, हिंदू बांधव, मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.