स्वस्त धान्य दुकानदार अपंगांची फसवणूक करीत आहे

नांदेड|
विष्णूनगर भागातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 102 चे दुकानदार श्याम वाघमारे यांनी प्रत्येक शिधा पत्रिका धारकांकडून 500 घेतले पण त्यांचे रेशन कार्ड ऑन लाईन  केले नाहीत अशी तक्रार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे जाफर खान खुर्शीद खान यांनी केली आहे.
                         
जाफर खान खुर्शीद खान हे हमालपुरा भागातील रहिवाशी आहेत.त्यांचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक 102 आहे. त्याचे चालक श्याम वाघमारे हे आहेत. श्याम वाघमारे यांनी माझ्याकडून आणि अनेकांकडून त्यांचे रेशन कार्ड ऑन लाईन करून देण्यासाठी ५०० रुपये घेतले आहेत. तरीही अद्याप एक वर्षाचा कालखंड झाला तरीही कार्ड ऑन लाईन झालेले नाही. धान्य घेणाऱ्यांनी बिल मागितले तर कार्बन कॉपीवर हाताने लिहून देतात. आलेले स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्री असे निवेदनात लिहिले आहे. दुकानात भाव फलक नाही,आवक जावक रजिस्टर नाही. आपल्या मर्जीने रेकार्ड तयार करतात.मी अपंग माणूस आहे.माझी आणि  इतर महिला,वयोवृध्द माणसांची फसवणूक का करता अशी विचारणा केली तर तुला काय करता येते ते कर असे सांगतात.माझी वर पर्यंत लिंक आहे अशी धमकी देतात.तरी मला आणि माझ्या सारख्या अनेकांवर अन्याय करणाऱ्या श्याम वाघमारे विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी