1 लाख 72 हजारांच्या दागिन्यांसह चोरटा स्थागुशाने पकडला

नांदेड| उस्मानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक घरांमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडून त्याच्याकडून 1 लाख 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करून त्यास उस्मानगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.  
                           
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक प्रवीण राठोड,पोलीस कर्मचारी गुंडेराव करले, अफजल पठाण, रविकिरण बाबर, विलास कदम, पिराजी गायकवाड, देविदास चव्हाण आणि चालक शिंदे हे गस्त करीत असतांना शिवाजी चौक सिडको येथे त्यांनी आनंदा देवराव भोसले यास पकडले. त्याच्या झडतीत त्याच्याकडे सोन्याचे  दागिने पण पोलिसांच्या शब्दात  पिवळ्या धातूचे दागिने भेटले. त्या दागिन्यांची किंमत 1 लाख 72 हजार रुपये आहे. त्याने हे दागिने उस्मानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली आहे. त्यासाठी दागिन्यांसह त्यास उस्मानगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. त्याने एकूण 23 ठिकाणी चोऱ्या केल्याची पण कबुली दिली आहे.हे गुन्हे करतांना त्याच्या सोबत इतर पाच गुन्हेगार होते असे हि भोसलेने सांगितले आहे.चोराला पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी कौतुक केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी