नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावरील प्राथमिक फेरीचा दिनांक २२ नोव्हे. रोजी रविशंकर झिंगरे लिखित विजय करभाजन दिग्दर्शित “विक्रमाचा घातांक क्ष” या नाटकाने झाला.
०६ नोव्हे. पासून सुरवात झालेल्या या स्पर्धेत एकूण १७ वेगवेगळ्या नाट्य प्रयोगांचे नांदेडकर रसिक प्रेक्षकाना आनंदे घेता आला. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी राजीव गांधी युवा फोरम, परभणी या संस्थेने
सादर केलेले नाटक “विक्रमाचा घातांक क्ष” ब्लॅक कॉमेडी आणि अॅबसर्डीटी अंगाने बसविण्यात आलेले हे नाटक प्रेक्षकाना विक्रम आणि वेताळाच्या जुन्या आठवणीत एका वेगळ्या विश्वात घेऊन जात्ते. इथे दिग्दर्शक यशस्वी ठरला आसे म्हणता येईल.
हे नाटक विवेक बुद्धीला स्मरून न वागू शकल्यामुळे आयुष्यात अनेक संधी हुकल्याचे शल्य या नाटकाच्या माध्यमातून खूप भावले. व त्या अनुषंगाने प्रियकर प्रीयेशिचा विवाहोत्तर संवाद एकच असून विलग व मनस्वीपणे दाखविला. उलट पत्नी आणि पतीचा प्रसंग एका घरात राहून विलग पद्धतीने साद्दार केला. या नाटकात प्रत्येक गोष्ट तीन वेगवेगळ्या शेलीतील प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे नाटक खर्या अर्थाने प्रायोगिक पद्धतीने पुढे सरकवत नेण्याचा प्रयत्न केला.
या नाटकातील पात्र विक्रम ( किशोर पुराणिक ) आणि वेताळ ( प्रा. किशोर विश्वमित्रे ) या जोडीने अत्यंत प्रभावशाली पद्धतीने अभिनय करून पात्राना न्याय दिला तर, पहिला ( विनोद डावरे ), दुसरी ( अर्चना चिक्षे ), छाया १ ( रवी पाठक ), छाया २ ( संजय पांडे ) यांनी आप आपली भूमिका उत्तम साकारली. दिगंबर दिवाण, अनिल पांडे यांची प्रकाशयोजना नाटकाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. तर बालनाथ देशपांडे, संकेत पांडे यांनी साकारलेले नेपथ्य नेत्रदिप आणि आशयानुरूप होते. समीरण झिंगरे, अनुपमा झिंगरे यांनी संगीताची बाजू सांभाळली, रंगभूषा आणि वेशभूषा अनुदास जोशी, सुभाष जोशी यांनी साकारली, रंगमंच व्यवस्था सुभाष जोगदंड, अमोल आंबेकर, श्रीकांत कुलकर्णी यांनी साकारली तर या नाटकाचे निर्माते होते संजय पांडे. एकंदर यावर्षीची स्पर्धा हि दर्जेदार व चुरशीची ठरली.
हि स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून दिनेश कवडे , सह समन्वयक किरण टाकळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेड, गोविंद जोशी, राहुल जोंधळे, राम चव्हाण, डॉ. विजयकुमार माहुरे, रवी श्यामराज, तुषार पोहरे, चक्रधर खानसोळे, अश्विन नरवाडे, विजय डोंगरे, यशवंत कागणे, रामेश्वर अवातीरक, नाथा चितळे, सुहास देशपांडे आणि सर्वच स्थानिक संस्थांचे सहकार्य लाभले. सर्व पत्रकार बंधूंचे खूप खूप आभार आपल्या सहकार्याशिवाय हि स्पर्धा यशस्वी होणे शक्य नव्हते. पुढील काळातही असेच सहकार्य लाभावे आणि नांदेड मधील सांस्कृतिक चळवळ आणखीन जोमाने फुलावी हि अपेक्षा सर्वांचे धन्यवाद मानले.