26 पासून भगवद्गीता ज्ञानयज्ञाचे आयोजन
नांदेड (नृसिंह न्यूज नेटवर्क) येथील हरे कृष्ण संस्था इस्कॉन व डॉ. विजयकुमार कोत्तावार परिवारातर्फे श्रीमद् भगवद्गीता जयंतीनिमित्त रविवार, दि. 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2017 पर्यंत श्रीमद् भगवद्गीता ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. विजयनगर हनुमान मंदिर मंगल कार्यालय खुले सभागृह येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत इस्कॉन, हरे कृष्ण संस्थेतील प्रख्यात वक्ते श्रीमान वरदराज दास यांच्या अमृतवाणीतून गीता ज्ञानयज्ञाचा भाविकांना लाभ मिळणार आहे.
कार्यक्रमांतर्गत दि. 26 रोजी दुपारी 4 वाजता शोभायात्रेद्वारे ग्रंथाची स्थापना व कथा प्रस्तावना तसेच गीतेचे जीवनातील महत्त्व आणि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली या विषयावर विवेचन होणार आहे. तर दि. 27 ते 2 डिसेंबर या कालावधीत ईश्वराच्या अस्तित्वाची खरी अनुभूती, मी कोण आहे ? स्वत:ची खरी ओळख, एक ईश्वर या अनेक ईश्वर, गीतेचे रहस्य, संपूर्ण गीता पारायण, गीतादान यज्ञ, चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट का घडते, भगवतगीतेचा सत्य संदेश भक्तीयोग आदी विषयांवर गुरूवर्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 11 शोभायात्रा, दुपारी 11 ते 12 गीता सार सांगता समारोह, दुपारी 12 ते 12.30 आरती आणि दुपारी 12.30 ते 3 पर्यंत महाप्रसाद संपन्न होणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे अवाहन संयोजकांनी केले आहे.