बिलोली (शिवराज भायनुरे) बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे पशुवैद्दकिय दवाखाना असुन या ठिकाणी पशुवैद्दकिय अधीकारी म्हणुन डॉ.एच.के.तोडे याची नियुक्ती करण्यात आली असुन ते गेल्या सहा महिण्या पासुन बेपता असुन सदरिल पशुवैद्दकिय दवाखाना नेहमी बंद राहत असल्यामुळे अनेक समस्याच्या विळाख्यात सापडला आहे.
या पशुवैद्दकिय दवाखाण्यात जणावराना वैद्दकिय उपचारासाठी सगरोळीसह, केसराळी, रामपुर, हिप्परगाथडी,
शिंपाळा, दैलतापुर, बोळेगांव या गांवातील शेतकरी जणावराना उपचारासाठी येथे आणतात. माञ येथे पञाचा शेड सुद्धा उपलब्ध नाही उपचार करताना जणावराना बाधण्यासाठी केवळ एक तेही जीर्ण झालेले लोखंडी कठडे आहे. येथे जर उपचार करण्यासाटी जास्त जणावरे आली तर शेतक-याना ताटकळत उभे राहावे लागते एक तर हा पशुवैद्दकिय दवाखाना तेलंगाणा व महाराष्ट सिमेच्या राज्य मार्गावर असुन या पशुवैद्यकिय दवाखान्याची पशुअधिकारी वीना अत्यंत दैनि अवस्था झाली अाहे. पशुवैद्किय दवाखान्यावरील टीनसेडला छिद्रे पडली आहेत. तर खिडक्या तुटल्या आहेत.आणि फरर्शीना तडे जात असल्यामुळे फर्शी दबली जाऊन दवाखाण्यातील फर्शी उखडुन जात आहे. तर दवाखाण्याच्या आजु बाजुला कुञ्यानी केलेली घाण व संध्याकाळी मद्दपिना संपुर्ण दवाण्याचा आवार मोकळा राहत आहे. तर पशुवैद्दकिय दवाखाणा धुळखात पडला आहे. जर आणखि कांही महीने अशिच अवस्था राहीली तर पशुवैद्दकिय दवाखाण्याच्या इमारतीची पडझड होण्यास वेळ लागणार नाही. परंतु आज रोजी जणावराणा उपचारासाठी तालुक्याच्या ठिकानी पायपीट करत न्यावे लागत आहे. त्यामुळे सगरोळी व परिसरातील शेतक-यांना नाहक ञास सहन करावा लागत आहे त्याचे काय ? अशी संतापाची लाट निर्मान होत आहे. त्यामुळे जिल्हा पशुवैद्दकिय अधीकारी तथा पदाधिका-यांनी जातीने लक्ष देऊन संबधीत पशुवैद्दकिय अधिकारी यांची चौकी करुन योग्यती कारवाही करण्यात यावी आणि सगरेळी येथील पशुवैद्दकिय दवाखाना पुर्वरत चालु करण्यात यावा आणि लवकरात लवकर पशुवैद्दकिय अधिकारी उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी सगरोळी व परिसरातील शेतकरी वर्गाकडुन होत आहे.