50 लाखांची फसवणुक करणाऱ्या बंटी - बबलीपैंकी बंटीला अटक

नांदेड (रामप्रसाद खंडेलवाल) नांदेडमधील 14 जणांना वीज वितरण कंपनीमध्ये नौकरी लावतो म्हणून 50 लाखांची फसवणुक करणाऱ्या नाशिक येथील एका भामट्याने आज सायंकाळी 6 वाजता भाग्यनगर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पन केले आहे. जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी त्यांचा अटकपुर्व जामीन अर्ज नामंजुर करून पोलिस ठाण्यात हजर होण्यास सांगितले होते.

दि. 9 ऑगस्ट 2017 रोजी नांदेडच्या भाग्यनगर पोलिस दिगंबर माधवराव पांचाळ यांच्यासह 14 तक्रारदारांनी अशी तक्रार केली होती की, नाशिक येथील नवलचंद मदनलाल जैन आणि त्यांच्या पत्नी आशा या दोघांनी त्या 14 जणांच्या मुलांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये नौकरी लाऊन देतो असे सांगून बंटी-बबली प्रकारची भुमिका वठवली. त्या भुमिकेला ते लोक बळी पडले कोणी 3 लाख, कोणी 2 लाख, कोणी 1 लाख असे रूपये त्या बंटी-बबलीला दिले आणि आपल्या मुलांना महाराष्ट्र वीज वितरण कंपनीमध्ये नौकरी लागेल याची वाट पाहत बसले. पण असे काही घडले नाही आणि त्यामुळे या सर्वांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि बंटी-बबली असल्याने जैन पती-पत्नीचा शोध सुरू केला. भाग्यनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक आर.जी. सांबळे यांनी दोनदा नाशिक गाठले आणि जैन पती-पत्नीचा शोध घेतला. पण हे दोघे बंटी-बबली त्यांना सापडले नाहीत. या दोन्ही बंटी-बबलीने नांदेडच्या जिल्हा न्यायालयात आपल्याला अटकपुर्व जामिन मिळाला यासाठी अर्ज सादर केला. जिल्हा न्यायालयाने या प्रकरणातील 50 लाखांची फसवणुक पाहता त्यांचा अटकपुर्व जामीन अर्ज नामंजुर केला. यानंतर या बंटी-बबलीने म्हणजेच नवलचंद मदनलाल जैन आणि आशा नवलचंद जैन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अपील केली. पण उच्च न्यायालयाने त्यांना अटकपुर्व जामीन तर दिलाच नाही उलट त्यांना पोलिस ठाण्यात हजर होण्याच्या सूचना केल्या. 

वीज वितरण कंपनीमध्ये शिपाई पदासाठी 3 लाख, लिपीक पदासाठी 4 लाख आणि कनिष्ठ अभियंता पदासाठी 8 लाख रूपये असा दर या बंटी-बबलीने काढला होता. 20 जागा भरण्याचा कोठा आपल्याला मिळाला आहे आणि तो आपण भरणार आहोत असे सांगितले. आपली फसवणुक झाल्याचे कळाल्यावर फसवणुक झालेल्यांनी बंटी-बबलीला गाठले त्यांनी पैसे तर  दिले नाही पण या सर्व 14 जणांना धनादेश दिले. ते धनादेश वठले नाहीत आणि आपण फसवले गेल्याचे निश्चित झाल्यानंतर या सर्वांनी पोलिस ठाणे गाठले आणि बंटी-बबलीविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. आता हा आरोपी अटक केल्याच्या माहितीला सहायक पोलिस निरीक्षक आर.जी. सांगळे यांनी दुजोरा दिला असून उर्वरित प्रक्रिया न्यायालयात उद्या होणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी