माहुर गडावर दहादिवस विविध कार्यक्रम... उद्या घटस्थापना

माहुर (सरफाराज दोसाणी) माहूर आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थानवर नवरात्र उत्सवात दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आणी प्रथम जिल्हा न्यायाधीश सुधिर कुलकर्णी, उपाध्यक्ष व उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, सचिव व सहायक
जिल्हाधिकारी नरेंद्र देशमुख,विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी, भवानीदास भोपी, श्रीपाद भोपी, विनायक फांदाडे, आशिष जोशी यांनी दिली आहे.

गुरवार दि.२१ रोजी अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर सकाळी साते ते साडे अकरा श्री रेणुकादेवीच्या वैदिक पुजेस प्रारंभ, सकाळी नऊ वाजता रेणुका देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील घटस्थापना होणार आहे.गडावर नवरात्र निमित्त दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित असून या काळात लाखो भाविक रेणुकेच्या दर्शनासाठी येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.देवी महात्म्यात नवरात्रीचे अनन्य साधारण महत्त्व आहे. नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या पराक्रमाचा, शौर्याचा पवित्र काळ.सतत नऊ दिवस रणचंडिकेने दृष्ट राक्षसांसोबत घनघोर युद्ध करून आपला पराक्रम दाखविला तो कालखंड.अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीने पराक्रम करुन विजयादशमीस विजय संपादित केला. भत्याच काळाला शारदीय नवरात्र असे म्हणतात. माहूर येथे दहा दिवस नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहे त्यात दि.21 रोजी प्रतिपादे पासुन  पंचमी पर्यंत नितीन जयसिंग धुमाळ यांचे सनई वादन होणार आहे तर प्रतिपदेलाच सायंकाळी डाॅ अविराज तायडे नाशिक यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम,द्वितीया ला पं.यादवराव फड पुणे यांच भक्ती संगीताचा कार्यक्रम,तृतीया ला पं.डाॅ.पराग चौधरी औरंगाबाद यांचा भक्ती संगीत,तर ललिता पंचमीला मुख्य कार्यक्रम श्रीधर फडके मुंबई यांचा गायण वादनाचा चा कार्यक्रम सायंकाळी 6 ते रात्रौ 12 पर्यंत असणार आहे.शष्टीला पं.मयुर गोविंद कंडारकर मुंबई यांच गायण सप्तमी ला कु.ईशा सुहास देशपांडे नांदेड कीर्तनकार अष्टमी ला नलिनी विनायक वरनगावकर यांचा कीर्तन व होम हवन पुजा,नवमीला हवन पुर्णाहुती पुजा,व दुसर्‍याला परशुराम पालखी सोहळा (सिमोलंघन) होणार आहे.एकंदरीत नवरात्रोत्सवात दैनदिन गायन सेवा असल्याने संगीत प्रेमी साठी हा नवरात्र महोत्सव परवनी ठरणार आहे.                        

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी