मणिमंगळसूत्र विकून शौचालय बांधणाऱ्या महिलेचा साडी-चोळी देऊन सन्मान

हिमायतनगर (अनिल मादसवार) माझ्या स्वप्नातील हिमायतनगर... स्वच्छ शहर... सुंदर शहर बनविण्यासाठी नगरपंचायतीने दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत येथील एका महिलेने मणी - मंगळसूत्र विकून शौचालय बांधून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला साथ दिली. त्या महिलेच्या कार्याचीच दाखल घेत माजाची आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते साडी -चोळी आणि बांधकामासाठी शासनाकडून मिळविणार्या अनुदानाचा धनादेश देऊन सन्मान केला आहे.
शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाची कामे प्रगतीपथावर असून, आगामी ०२ ऑक्टोबर पर्यंत शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शहरात स्वच्छतेबरोबर, शौचालय बांधकाम अंतिम टप्प्यात आली असून, यात सहभाग गेहटलेल्या १५०० हुन अधिक लाभार्त्यांच्या खात्यात शौचालयाच्या अनुदानाचा निधी वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान शहरातल्या वॉर्ड क्रमांक ११ मधील निराधार महिला श्रीमती योगिता पंजाब माने हिने शासनाच्या रक्कमेची वाट न पाहता पतीच्या निधनानंतर तीन मुलींचे पालन पोषण करत स्वतःचे मणी मंगळसूत्र विकून शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. नगरपंचायत प्रशासन व शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत शौचालय बांधून सर्वानी आदर्श घ्यावा असे कार्य केल्याचे समजताच युवा नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांनी प्रत्यक्ष त्या महिला लाभार्थीच्या घरी जाऊन शौचालयांच्या बांधकामाची पाहणी करून अभिनंदन केले. आणि तिच्या कार्याची दखल घेऊन दि.२० बुधवारी संपन्न झालेल्या कार्यक्रमात माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर, मुख्याधिकारी नितीन बागुल, विकास पाटील देवसरकर, नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांच्या हस्ते साडी -चोळी व शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अनुदानाचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जवळगावकरांनी सादर महिलेचा अभिनंदन करून शहरातील सर्वानी स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभागी होऊन स्वच्छ हिमायतनगर... सुंदर हिमायतनगर बनविनसाठी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी