नांदेड(खास प्रतिनिधी)जय उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिचून होणारी राज्य महामार्गावर बिनापरवाना होणारी दारूची वाहतूक कुंटूर पोलिसांनी काल पकडली आहे.64 हजारांची दारू आणि दीड लाखाची चारचाकी गाडी जप्त केली आहे.
बिलोलीचे उप विभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर कुंटूरचे सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील,परिविक्षाधीन पोलीस उप निरीक्षक विठू बोने,सहायक पोलीस उप निरीक्षक मारोती भोळे पोलीस कर्मचारी सांगवीकर,राठोड हे सर्व कहाळा या गावाजवळ जाऊन मिळालेल्या माहितीला होते.तेव्हा एक चारचाकी एमएच 26 एडी 5621आली.त्या गाडीची तपासणी केली तेव्हा त्यात देशी दारूच्या 180 एमएल भरलेल्या बाटल्यांचे 28 बॉक्स सापडले.या दारूची किंमत बाजारात 64 हजार रुपये असल्याची नोंद तक्रारीत आहे.सोबतच कुंटूर पोलिसांनी एक लाख 50 हजार रुपये किमतीची चारचाकी गाडी जप्त केली आहे.या बाबत मारोती भोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुंटूर पोलिसांनी चारचाकी गाडीचा चालक परवेजखा अहमदखा पठाण (30) आणि त्याचा सहकारी पानपट्टी चालक पंढरी माधव भालेराव (27) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका कुत्र्यासह १ लाख ४७ हजारांचा चोरीचा ऐवज जप्त;
स्थानिक गुन्हा शाखेची कार्यवाही
चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन संघर्ष ग्रस्त बालकाला पकडून स्थानिक गुन्हा शाखेने चार चोऱ्यांमधील जवळपास सर्वच चोरीचा ऐवज जप्त केला आहे.बालन्याय मंडळाने त्या बालकांची रवानगी सध्या बाल सुधार गृहात केली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने दिलेल्या माहितीनुसार 19 मार्च रोजी देवानंद रामलिंग बेडके यांचे घर फोडून चोरटयांनी ९० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.दिनांक 31 मार्च रोजी अमोल उत्तमराव चव्हाण यांच्या घरातील पाळीव कुत्रा 15 हजार रुपयांचा चोरीला गेला होता.मुकुंद वैद्य यांच्याघरातील ठेवलेली दुचाकी गाडी 50 हजार रुपयांची चोरीला गेली होती.विशाल साहेबराव होळकर यांच्या घरातून 19 मार्च रोजी एक चार हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला होता.या चार चोऱ्या मध्ये भाग्यनगर मध्ये 2, विमानतळ मध्ये 1 आणि शिवाजीनगर मध्ये 1 अश्या झाली होती.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक सदानंद वाघमारे,पोलीस कर्मचारी गुंडेराव करले,मेहरकर आणि मुंढे यांनी एका अल्पवयीन बालकाला पकडले कडून चोरीला गेलेल्या 1 लाख 59 हजार रुपयांच्या ऐवजांपैकी 1 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.या अल्पवयीन, विधी संघर्ष ग्रस्त बालकाला न्यायालयाने जामिनीवर तर रवानगी बाळ सुधार गृहात केली आहे.चोरीला गेलेला कुत्रा त्याच्या मूळ मालकाला परत देण्यात आला आहे.