नगरपंचायतीने गणेश - दुर्गामूर्ती विसर्जनाची समस्या कायम मार्गी लावावी - दत्तात्रेय वाळके

हिमायतनगर(अनिल मादसवार)गणेश - दुर्गामूर्ती विसर्जनाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पारंपरिक मंदिराच्या विहिरीत विसर्जित केलेल्या मुर्त्या उघड्या पडत असल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यावर कायम तोडगा काढून उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नगरपंचायतीने काटेकोरपणे नियोजन करावे अश्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय वाळके यांनी दिल्या. 

ते आगामी पोळा, गौरी - गणेशोत्सव, दुर्गाउत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर दि.30 मंगळवारी येथील पोलीस स्थानकात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी मंचावर महसुलचे
उपविभागीय अधिकारी आविशकुमार सोनोने, तहसीलदार गजानन शिंदे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन बागुल, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास बडगु, नगराध्यक्ष अ अखिल अ.हमीद, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, माजी.जी.प.सदस्य समद खान, जेष्ठ पत्रकार भास्कर दुसे, सौ.लताताई पाध्ये, मथुराबाई भोयर, नगरसेविका सौ.पंचफुलाबाई लोणे आदींची उपस्थिती होती. शहरातील प्रतिष्टीत नागरिक, गणेश मंडळाचे युवक यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले कि, उत्सव व निवडनुकीच्या काळात गणेश मंडळांनी सर्व नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा. नऊ दिवसाच्या गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे भाषण, खेळ यासह विविध स्पर्धा कार्यक्रम आयोजन करावे. तसेच उत्सवासाठी जमा झालेल्या निधीचा समाज उपयोग, शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचे विविध उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण करावा. तसेच कमी उंचीची व पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन करावी, मूर्तीच्या सुरक्षेसाठी स्टेजसह आजूबाजूच्या स्थळाची चोख व्यवस्था करावी. कोणताही धर्माचा, मंदिर - मस्जिदीचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडळाने मूर्ती स्थापन केलेल्या स्थळाचा गैरवापर करून उत्सवात बाधा निर्माण करू नये. शक्यतोवर मद्यपीना मूर्तीस्थळी अथवा मिरवणुकीत सामील करू नये, आपली एखादी चूक हि उत्सवाची शांतता भंग करू शकते.

शासनाने डीजेवर बंदी लादली असून, पोलीस प्रशासनाकडून ध्वनी मापक यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे युवकांनी डीजे न लावता ढोल ताशे, भजनी मंडळे, सामाजिक देखावे, बैंड, लेझीम पथकाद्वारे गणेश व दुर्गा उत्सव साजरा करावा. दरम्यान यात होणारी बेशिस्ती कदापि खपवून घेतली जाणार नाही अश्या सक्त सूचनाही त्यांनी केल्या. याप्रसंगी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अन्वर खान, कांग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन तुप्तेवार, कृउबाचे सुभाष शिंदे, नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, अनिल पाटील, म.जावेद अ. गन्नी, विनायक मेंडके, ज्ञानेश्वर शिंदे, शे.रहीम पटेल, सरदार खान, विजय शिंदे, जफर लाला, फेरोज खान युसूफखान, उदय देशपांडे, खुदूस मौलाना, आहद भाई, मंदिर समितीचे सेक्रेटरी, राजेश्वर चिंतावार, प्रकाश शिंदे, विठ्ठलराव वानखेडे, देविदास मुधोळकर, अनंता देवकते, माधव पाळजकर, बाबुराव होनमने, हनुसिंह ठाकूर, संतोष गाजेवार, श्याम ढगे, गजानन चायल, राम सूर्यवंशी, गजानन मुत्तलवाड, गजानन मांगुळकर, रामदास रामदिनवार, श्याम जक्कलवाड, भारत डाके, दीपक सोनसळे, संतोष वानखेडे, गजू हरडपकर, गोविंद शिंदे, विलास वानखेडे, राम नरवाडे, आशिष सकवान, पापा पार्डीकर, पंकज बंडेवार, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव कानबा पोपलवार, प्रकाश जैन, साईनाथ धोबे, असद मौलाना, शुद्धोधन हनवते, दिलीप शिंदे, शे.इस्माईल, धम्मा मुनेश्वर, परमेश्वर शिंदे, संजय कवडे, वसंत राठोड, यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार, पोलिस कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी मानले.   
गणेशोत्सव काळात कोणीही व्यसन करू नये - सोनोने 

यावेळी उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी सुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले कि, अध्यात्मिक प्रगती, आनंद व एकत्रीकरणासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेश मंडळाने परंपरागत मार्गानेच मिरवणूक काढावी. आवाजाची मर्यादा पाळावी, श्री गणेशाच्या मुर्त्या लहान आणाव्यात आपल्या सहकार्यासाठी प्रशासन तयार आहे. विसर्जन रस्त्यावरील खड्डे, महावितरणने सुरळीत विजपुरवठा करावा. गणेशोत्सव काळात कोणीही व्यसन करू नये, व्यसनामुळे श्रीची विटंबना होते, याची सर्वानी काळजी घ्यावी. आणि हिमायतनगरचा आदर्श अन्य तालुक्यांनी व गावांनी घ्यावा असा उत्सव साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले. 
फुलांची उधळणाने उत्सव साजरे करा - समद खान

माजी जी.प.सदस्य समद खान यांनी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित गणेश मंडळाच्या मूर्ती विसर्जनावर चर्चा न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा. यासाठी नगरपंचायतीने विशेष निधीतून तलावात विहरीत गाळकाढून उंची वाढवावी, येथे पूल उभारून कनकेश्वर तलावाच्या सुशुभोकरण बरोबर रस्ता दुरुस्ती, विद्दुत पुरवठा व विसर्जनाची कायम व्यवस्था करावी अशी मागणी करून गणेश मंडळांनी सुद्धा गुलाल ऐवजी फुलांची उधळण करून उत्सव साजरा करावा यासाठी लागणाऱ्या फुलांची सोय मी करून देईन असे सांगितले.
कनकेश्वर तलावाची पाहणी

बैठकी दरम्यान परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या सदस्य लताताई पाध्ये यांनी गणेश मुर्त्या मंदिरातील विहिरीत टाकल्या जात असल्याने पाणी दूषित होत आहे, तसेच मंदिर परिसरात दुर्गंधी सुटत असून, मुर्त्या व निर्माल्य वर दिसत असल्याने एक प्रकारे विटंबना होत असल्याने विसर्जनास सक्त विरोध दर्शविला. त्यामुळे विसर्जनावर कायम तोडगा काढण्यासाठी वरील मान्यवरांनी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निर्सगरम्य कनकेश्वर तलाव परिसराची पाहणी केली. येथे मुबलक पाणी उपलब्ध असून, तात्काळ उपाययोजनासाठी घाट तयार करून तात्पूरती विसर्जनाची व्यवस्था केली जाईल. यासाठी रस्ता, विजेची सोय करून गणेश व दुर्गा मूर्ती विसर्जनाची समस्या सोडविण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी दिले. यावेळी गणेशमंडळाच्या युवकांनी जोपर्यंत कायम व्यवस्था होत नाही तोपर्यंत येथे विसर्जन करणार नाही असा पवित्र घेतला. आता नगरपंचायत पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक घेऊन यावर काय उपाययोजना करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी