राज्यात लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव, लोकमान्य उत्सव राबविण्याचा शासनाचा निर्णय

नांदेड(अनिल मादसवार)लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची 160 वी जयंती वर्ष, त्यांनी सुरु केलेल्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या चळवळीला होत असलेली 125 वर्ष व "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणी तो मी मिळविणारच" या उदगाराचे शताब्दी वर्षानिमीत्ताने यावर्षी राज्यात "लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव" व "लोकमान्य उत्सव" असे विविध कार्यक्रम राबविण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. या स्पर्धांमध्ये गणेशमंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या प्रेसनोटद्वारे करण्यात आले आहे.

गणेश मंडळाच्या माध्यमातुन लोकमान्य टिळकाचे विचार त्यांची चतु:सुञी तसेच अन्य उपक्रमाव्दारे जनजागृती घडवतील अशा सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धा आयोजीत करुन गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळाची पध्दत, देखावे, सामाजीक कार्य,समाजाचा सहभाग अदि विषया बाबत मुल्यांकन करुन शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विजेते गणेश मंडळाचा गौरव करुन रोख बक्षिसे देण्यात येतील.या स्पर्धेत भाग घेण्या करीता सार्वजनीक गणेश मंडळानी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या  स्वदेशी , साक्षरता , बेटी बचाव , व्यसनमुक्ती , जलसंवर्धन या पैकी एका कल्पनेशी निगडीत देखावा करणे आवश्यक आहे.

स्पर्धेत भाग घेण्याची पध्दत 
· महाराष्ट्र राज्यातील कोणतेही सार्वजनीक गणेश मंडळभाग घेवु शकतात.
· धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणी केलेली असावी.
· विहित नमुन्यातील अर्ज संबंधीत तालुका गट शिक्षणाधिका-याकडे सादर करावा.
· अर्ज सादर केरण्याची मुदत 29 जुलै ते 29 ऑगस्ट राहील.

सार्वजनीक गणेश मंडळाची तपासणी व पारीतोषक करीता निवड करण्या बाबतची कार्यप्रध्दती

तालुकास्तर समीती :- तालुका स्तरावरील निवड समिती तालुका गटशिक्षण अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली राहणार असुन तालुक्यातील सार्वजनीक गणेशोत्सव समितीच्या ठिकाणी 08 ते 12 सप्टेबर 2016 या कालावधीत प्रत्यक्ष भेट देवुन विहित केलेल्या गुणांकन पध्दतीनुसार गुणांकन दिल्यानंतर 16 ते 18 सप्टेंबर 2016 रोजी तालुक्यामधील प्रथम, व्दितीय, तृतीय निकाल जाहीर करतील. 

जिल्हास्तर समिती :- जिल्हास्तरावरील निवड समितीजिल्हा शिक्षण अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली राहणार असुन तालुकास्तर समिती कडुन प्राप्त जिल्हयातील माहीतीची वर्गवारी करुन गुणानुक्रमानुसार जिल्हयातील प्रथम व्दितीय व तृतीय पारितोषक प्राप्त मंडळांची नावे दिं.22 सप्टेबर 2016 रोजी 10.00 वाजता जाहीर करतील.

विभागीय स्तर समिती :- विभागीय स्तरावरील निवड समिती उपसंचालक (शिक्षण)यांचे अध्यक्षते खाली राहणार असुन जिल्हास्तर समितीकडुन प्राप्त माहीतीची वर्गवारी करुन गुणानुक्रमानुसार महसुल विभागतील प्रथम, व्दितीय व तृतीय पारितोषक प्राप्त मंडळांची नावे दिं.25 सप्टेबर 2016 रोजी 10.00 वाजता जाहीर करण्यात येतील.

असे सूचित करण्यात आले असून, नांदेड जिल्हयातील सर्व सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी "लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव " व " लोकमान्य उत्सव " अनुषंगाने आयोजित सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धा बाबत दिं. 22/08/2016 रोजी 16.00 वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्हाधिकारी सुरेश काकांनी, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित राहावे. असे आवाहन जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी