2 कोटी 14 लाखाच्या विविध विकास कामाचा उद्या उदघाटन सोहळा

हिमायतनगर (प्रतिनिधी) नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीच्या विकासाची घौडदोड सुरु झाली असून, उद्या दि.17 बुधवारी माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या शुभ हस्ते 2 कोटी 14 लाखाच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती युवा नगराध्यक्ष अ. आखिल अ. हमीद यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.
शहरातील विकास कामासाठी 14 व वित्त आयोग निधी अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन (अंतर्गत साफसफाई बाबत) सिमेंट रस्ते बांधकाम व सी.सी.नाली बांधकाम करणे आणि शहरातील सर्व मुख्य रस्त्यावर एल. ई. डी. स्ट्रीट लाईट बसविणे. आणि शहरातील पाच प्रमुख चौकामध्ये मोठे हायमास्ट लाईट पोल उभारण्यासाठी 2 कोटी 14 लाखाच्या निधी प्राप्त झाला आहे. यातून बोरगडी ते मारोती रस्ता, बोरगाडी ते गणेशवाडी रस्ता, उमरचौक, पवनसुत हनुमान चौक आणि नगरपंचायत हिमायतनगर येथे उदघाटन सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास काँग्रेस तालुकाध्यक्ष विकास पाटील, जी.प.सदस्य सुभाष राठोड, माजी सरपंच चांदभाई, माजी हद्यक्ष जनार्धन ताडेवाड, रफिक सेठ, यांच्यासह नागपंचायतीचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही अ.अखिल अ.हमीद यांनी केले. यावेळी नगरसेवक प्रभाकर मुधोळकर, म. जावेद अ.गंन्नी, सालेहा बेगम अ. आहद, सौ.पंचफुलाबाई गंगाराम लोणे, सौ.लक्ष्मीबाई मल्लू भवरे, राबियाबेगम मुजतबा खान, हीनाबी सरदार खान, नूरजहाँबेगम युसूफखान, शमीम बानो अन्वर खान, अ.गुफरान अ.हमीद, सौ.सुरेखा सदाशिव सातव, शे.रहीम शे. मीरासाब, ज्ञानेश्वर शिंदे आदींसह, कार्यालयीन कर्मचारी मेहमुद साब बंदगी, मारोती हेंद्रे, बाळू हरडपकर, विठ्ठल शिंदे यांच्यासह अनेकांचं उपस्थिती होती.         

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी