अन्न, वस्त्रासह, आर्थिक मदत

वडगाव ज.पिडीतग्रस्तांना आ.आष्टीकरांनी दिला मायेचा आधार  


हिमायतनगर(कानबा पोपलवार) तालुक्यातील मौजे वडगाव ज.येथील आगीत भस्मसात झालेल्या घराच्या कुटुंबाना दि.०९ गुरुवारी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी अन्न, धान्य, कपडे व आर्थिक मदतीचा हात पुढे करून भरघोस मदत देवून मायेचा आधार दिला आहे.  

दि.०६ जुलै च्या मध्यरात्री तालुक्यातील मौजे वडगाव ज.येथील घरांना आग लागून ११ लाखाचे नुकसान झाले होते. या घटनेचा पंचनामा महसूल विभागाचे तलाठी श्री शिंदे यांनी करून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. या घटनेत संसार उपयोगी व शेती साहित्य व रोख रक्कम भस्मसात झाल्याने आता जगायचे कसे ...? असा प्रश्न गंगावलेल्या शेतकर्यासमोर उभा टाकला आहे. शासनाची तुटपुंजी आर्थिक मदतीवर संसाराचा डोलारा उभा कसा करायचा वर्षभर गुजराण करायची तरी कशी..? असे एक ना अनेक प्रश्न घरे उध्वस्त झालेल्या कुटुंबासमोर होती. घटना घडल्याने अनेक नेत्यांनी जाळीत शेतकऱ्यांची भेट देवून केवळ सांत्वन केले. परंतु आश्वासनाशिवाय दुसरे काहीच दिले नाही, तर शहरातील वासवी क्लबच्या लोकानी भेट देवून अन्न धान्य देवून त्यांचे अश्रू पुसून मायेचा आधार दिला आहे.

घटनेच्या काळात मुंबईला गेलेले हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आ.नागेश पाटील आष्टीकर परत येताच प्रथम त्यांनी जळीत घटनेच्या वडगाव ज. येथे भेट दिली. या ठिकाणी भेट देवून नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाची आस्थेवाईकपने चौकशी केली. आणि आधार देत प्रत्येक कुटुंबियांना २ क्वीन्टल अन्न धान्य, कपडे, साडी, लुगडे, चिमुकल्यांना कपडे, व रोख १० हजारची आर्थिक मदत केली. तसेच लवकरच घरकुल व शासनाकडून अधिकाधिक तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या मदतीने भारावलेल्या शेतकर्यांनी " आमदार म्हणजे खरच जनता राजा " अश्या कृतज्ञ शब्दांनी पिडीत कुटुंबांच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले. 

तसेच त्यांच्यासोबत आलेल्या परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी यांनी पिडीत कुटुंबास प्रत्येकी ५ हजारची मदत, आणि बजरंग दलातर्फे कुटुंबियांना २ हजारची आर्थिक मदत सुपूर्द केली. या सर्वांच्या मदतीच्या हातभाराने पिडीत कुटुंबियांना जगण्याची नवी उर्जा मिळाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा दरवर्षी शेतकर्यांना फटका बसत असल्याने गतवर्षीच्या दुष्काळातून शेतकरी अजून सावरला नाही. तोच आगीत घरे उध्वस्त झाल्याने वडगावच्या दहा कुटुंबांचा संसार उघड्यावर आला होता. यावेळी पोलिस पाटील, सरपंच, गावकरी नागरिक, शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी