भव्ययात्रा महोत्सव

महाशिवरात्र निमित्त श्रीपरमेश्वर देवस्थानच्या भव्ययात्रा महोत्सवाचे आयोजन ..
२ लाख ०९ हजाराच्या बक्षिसांची लयलूट 

  
हिमायतनगर(अनिल मादसवार)सबंध महाराष्ट्र - आंध्रप्रदेश - कर्नाटक परिसरात ख्यातीप्राप्त हिमायतनगर(वाढोणा - वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हि यात्रा रविवार दि.१५ फेब्रुवारी ते ०३ मार्च २०१५ पर्यंत चालणार आहे. श्रीच्या यात्रा महोत्सवात भाविक - भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व यात्रेकरूनी हजेली लावून श्री दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे विश्वस्त व गावकरी मंडळींनी नांदेड नेउज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे. सदर यात्रा महोत्सवानिमित्त भरगच्च धार्मिक - सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दरम्यान होणार्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी २ लाख ०९ हजाराची भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.  

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यात्रोत्सव हा १५ दिवस चालणार असून, याची सुरुवात रविवार दि.१५ फेब्रुवारी पासून होऊन मंगळवार दि.०३ मार्च पर्यंत चालणार आहे. दरम्यान सात दिवस काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी व वीणा पारायण सोहळा, किर्तन, प्रवचनाने सप्ताह साजरा केला जाणार असून, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मुख्य व्यासपीठ श्री ज्ञानेश्वर माउली महाराज बोरगडीकर हे सांभाळणार आहेत. विना, काकडा - भजन, हरिपाठ हे परमेश्वर भजनी मंडळीच्या सहकार्याने संपन्न होणार आहे. दरम्यान दि.१५ ते १७ या तीन दिवसाच्या कालावधीत जगद्गुरु श्रीश्रीश्री १००८ भीमाशंकरलिंग स्वामी शिवाचार्य महाराज(केदार जगद्गुरु) यांचा इष्टलिंग महापूजेचा कार्यक्रम सकाळी ८ ते १२ वेळेत संपन्न होणार आहे. तीन दिवस सायंकाळी ५ ते ६ च्या वेळेत प्रवचनहि होणार आहे. सात दिवसाच्या कालावधीत नामांकित कीर्तनकार हभप.उफाडे महाराज शिर्डी, हभप.भरत महाराज रामदासी बीड, हभप.जालंधर महाराज, भागवताचार्य हभप.तुकाराम शास्त्री महाराज परळी, रामायनाचार्य हभप.नामदेव लबडे महाराज पंढरपूर, हभप.भागवताचार्य सुनील महाराज आष्टीकर बीड, हभप.सुरेश महाराज पोफळीकर, यांच्या मधुर वाणीतून उपस्थितांना भक्तीचा मार्ग दाखविला जाणार आहे. तसेच सप्त्याच्या शेवटच्या दिवशी हभप अशोक महाराज तळणीकर यांचे गोपाळकाला दहीहंडी काल्याचे कीर्तन होऊन काल्याच्या प्रसादाचे वितरण व शहरातील मुख्य रस्त्यावरून राधा - कृष्ण झाकीची मिरवणूक बैण्डबाजाच्या गजरात काढण्यात येणार आहे. 

माघ कृ.१३ दि.१७ महाशिवरात्री दिनी पारण्याचा उपवास धरणाऱ्या व दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना बुलढाणा अर्बन बैंक, ईको अग्रो सोडस हैद्राबाद(परमेश्वर मका) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान पाच पुरोहिताच्या मंगल वाणीत महाशिवरात्री दिनी मध्यरात्री १२ ते ०३ वाजेच्या दरम्यान श्री परमेश्वराचा महाअभिषेक सोहळा, महापूजा ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष मा.तहसीलदार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मंगलमय सोहळ्यात श्रीचा अलंकार सोहळा संपन्न होईल. दुसऱ्या दिवसापासून भाविक - भक्तांना अलंकार रुपी श्री परमेश्वराचे दर्शन दि.२२ फेब्रुवारी २०१५ रविवार दहीहंडी काल्यापर्यंत घेता येणार आहे. 

सहा दिवस ब्राम्हण, मराठा, माली, अर्यवैश्य, पद्मशाली, वीरशैव या समाज बांधवांच्या वतीने पर्मापारागत पंगतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतरच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि.२३ बडबड गीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शालेय भाषण स्पर्धा मंगळवार दि.२४ रोजी रात्री ८ ते १० या वेळेत संपन्न होणार आहे. यात आईची थोरवी व भारतीय संस्कृती पाश्चात्य संस्कृती पेक्षा कशी श्रेष्ठ या विषयावर होणार आहे. यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास २१०० रुपये, द्वितीय १५००, तृतीय १००१ रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच मंगळवार दि.२४ व बुधवार दि.२५ रोजी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, यासह विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत, यात विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहेत. बुधवार दि.२५ रोजी रात्री चिमुकल्या बालकांसाठी सुदृढ बालक स्पर्धा आयोजीत  करण्यात आले आहे. गुरुवार दि.२६ रोजी शेतकऱ्यांसाठी भव्य पशु व कृषी प्रदर्शन होणार आहे, यात सहभागी शेतकर्यांना जी.प. कृषी व पंचायत समितीच्या वतीने त्यांच्या नियमानुसार बक्षीस देण्यात येणार आहे. 

शुक्रवार २७ रोजी राष्ट्रीय खेळ कब्बडी स्पर्धा होणार आहेत, यात प्रथम संघास १११११ प्रथम क्रमांकाचे बक्षी आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या वतीने जाहीर करण्यात आले असून, दुसरे बक्षी ७००१ रुपये, तिसरे बक्षीस ४००१ रुपये ठेवण्यात आले आहे. शनिवार दि.२८ रोजी भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ०९ वाजता सुरुवात होणार आहे. शंकर पटात प्रथम येणाऱ्या बैलजोडीस १२००१ रुपये, दुसरे ७००१ रुपये, तिसरे बक्षीस ४००१ बक्षीस यासह अनेक बक्षीस दिले जाणार आहे. तसेच शनिवार दि.२८ रात्री ९ ते १२ च्या दरम्यान विविध गुणदर्शन स्पर्धा होणार आहे, यात विजेत्या गटसमूहाला प्रथम बक्षीस ४००१ रुपये, दुसरे ३००१, तृतीय २५०० रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले आहे. 

रविवार दि.०१ मार्च रोजी भजनी मंडळ व संगीत प्रेमींसाठी भव्य भजन स्पर्धा, या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या मंडळास ७००१ रुपयाचे बक्षीस, दुसरे बक्षीस ५००१ रुपये, तिसरे बक्षीस ४००१ यासह अनेक बक्षिसे दिली जाणार आहे. तसेच सोमवार ०२ मार्च रोजी कुस्ती शौकिनांसाठी भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मनाची कुस्ती होणार असून, यात जिंकणाऱ्या मल्लास प्रथम क्रमांकाचे ७००१ रुपयाचे बक्षीस, दुसरे बक्षीस २००१ यासह १०००, ५०० च्या बक्षिसाचे अनेक कुस्त्या संपन्न होणार आहेत. तसेच यात्रा महोत्सवात आयोजित अन्य स्पर्धांमध्ये सहभागी होणार्या सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस मंदिर समितीने ठरविल्या प्रमाणे दिले जाणार आहे. दि.०३ मार्च रोजी यात्रा उत्सवाचा समारोप यात्रा काळात सहकार्य करणार्यांच्या सत्काराने केला जाणार आहे.   

महाशिवरात्री यात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, त्या निमित्ताने मंदिर रंग रांगोटी करण्यात आली आहे. यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विविध प्रकारच्या १६ समित्यांची स्थापना करण्यात येउन, त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या पर्व काळात सर्व - भाविक भक्तांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मा.तहसीलदार साहेब, मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, जेष्ठ संचालक लक्ष्मण शक्करगे, भास्कर दुसे, प्रकाश शिंदे, किशनरामलू मादसवार, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, अनंता देवकते, श्याम पावणेकर, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, लिपिक बाबुराव भोयर व गावकरी मंडळीनी केले आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी