आश्चर्यम



हिमायतनगर(वार्ताहर)मौजे कामारी येथील एका शेतकऱ्याच्या गाईने आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास तीन बछाड्याला जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हि आश्चर्यकारक घटना पाहण्यासाठी गावकरी व परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे कामारी येथील शेतकरी मंचकराव नरवाडे यांची आठ वर्षी गाय आजवर तीन वेळा व्याली होती. चौथ्यांदा आलेल्या बहराने सदर गोमाता गरोदर होती. दरम्यान दि.३० शुक्रवारच्या सकाळी ८.३० वाजेच्या मुहूर्तावर गाईने तीन बछड्याना जन्म दिला असून, सदर गाईचे वय जवळपास ८ वर्ष आहे. तीन बछड्याना गाय जन्म देऊ शकते हे ऐकले होते, परंतु कधी प्रत्यक्षात पहिले नाही असे या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी सांगितले. मात्र कामारी येथील शेतकऱ्याच्या गाईने पहिल्यांदाच तीन बछड्याना जन्म दिल्याने शेतकरी अनादित आहे. यात दोन गोऱ्हे व एक कालवड असून, तिघांची प्रकृती चांगली असल्याचे शेतकर्याने नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले. तीन बछड्याने जन्म दिल्याची घटना समजताच गावकरी व पंचक्रोशीती शेतकरी नागरिक बछड्याना पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. तिन्ही लाल कंधारी रंगाचे व गोंडस असल्याने त्यांना पाहून आश्चर्यचकित होत आहेत.

याबाबत तालुक्याचे तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश बुन्नावर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, मनुष्यासारखे कधी गाईचे सोनोग्राफी होत नसते म्हणून गरोदर पानात तिच्या पोटात किती बाळ आहेत हे समजू शकत नाही. तीन बछाड्याना जन्म देणे हि नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी