प्रशिक्षण

सूत्रसंचलनाच्या कार्यशाळेत प्रशिक्षण


नांदेड(विशेष प्रतिनिधी)अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या महिला सांस्कृतिक चळवळीअंतर्गत आयोजीत सूत्रसंचलनाच्या कार्यशाळेत अ.भा.म.नाट्य परिषद नांदेड शाखेचे प्रमुख कार्यवाह व आर्ट ऑफ लिव्हिंग वायएलटीपी प्रशिक्षक गोविंद जोशी यांनी प्रशिक्षण दिले. 

या कार्यशाळेत विविध वयोगटातील २२ महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी कार्यशाळेचे उद्घाटन प्रसिद्ध समाजसेविका व गोदातीर समचारच्या सौ. हेमा रसाळ यांनी केले तर प्रमुख पाहुण्या विवेक वर्धिनी अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्ज्वला सदावर्ते ह्या होत्या. 


या कार्यशाळेचा लाभ डॉ. पुष्पा कोकीळ, संध्या देशमुख, हर्षदा पांडे, जयश्री सुभेदार, शिल्पा कदम, मनिषा वाघमारे, अर्चना खाकरे, श्रेया देव, डॉ. चित्रा देव, विजया जामकर, प्रणिता राठोड, कविता शिंदे, तपस्या रत्नपारखी, मनिषा गाढे, संध्या कदम, दिपाली ओपळ्कर, कांचन रांदड, राजश्री सौंदनकर, वैष्णवी बोड्डावार, नेहा नरवाडे, विभा जोशी, डॉ.सुरेखा वडोदख या महिलांनी घेतला.



कार्यशाळेचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन परिषदेच्या उपाध्यक्षा व महिला चळवळीच्या समिती प्रमुख रश्मी वडवळकर यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संजीव कुळ्कर्णी, अशोक तेरकर, किशनराव बोडखे व विवेक भोगले यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी