पथदिव्यामुळे शहर झगमगले

परमेश्वर मंदिर ते कमानी पर्यंतच्या पथदिव्यामुळे शहर झगमगले 

हिमायतनगर(वार्ताहर)कमानीपासून ते परमेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुभाजकामध्ये बसविण्यात आलेल्या पथदिव्यांमुळे हिमायतनगर शहर झगमगले असून, यामुळे रात्रीला दिवसाचा प्रत्यय येत आहे. परिणामी हिमायतनगर तीर्थक्षेत्राच्या गावाच्या सौंदर्यात भर पडल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

माजी आमदार जवळगावकर यांनी शहरात ये - जा करणाऱ्या प्रवाशी, नागरिक व वाहनधारकांची अडचण लक्षात घेवून त्यांच्या कार्यकाळात आमदार निधीतून पथदिव्याच्या कामासाठी ४ लाख ६० हजारचा निधी मंजूर केला होता. त्यातून नुकतेच पथदिवे बसविण्यात आले असून, याचे उद्घाटन माधवराव पाटील यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. त्यानंतर रस्त्यावर पडलेला झगमगाट पाहून सामन्यासह प्रवाशी वर्गातून आभार मानले जात आहे. या पथदिव्यामुळे आगामी फेब्रुवारी महिन्यात होणर्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविक - भक्तांची व यात्रेकरूंची मोठी सोय झाली आहे. सदर पथदिव्याच्या उद्घाटनास जी.प.सदस्य सुभाष राठोड, कृऊबाचे सभापतील दत्तराम पाटील, पंडित पाटील, जनार्धन ताडेवाड, विजय शिंदे, विकास पाटील, गणेश शिंदे, चांद भाई, अब्दुल्ला भाई, गौतम पिंचा, गोविंद बंडेवार, संजय माने, रफिक सेठ यांच्यासह अनेक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.  

गुत्तेदारच्या कामाबाबत साशंक्ता 

मोठ्या मेहनतीने येथील रस्त्यासाठी स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी लाखो रुपये मंजूर करून आणले, मात्र दिवे बसविण्यात गुत्तेदाराने हलगर्जीपणा चालविल्याने पहिल्याच दिवशी दोन लाईट बंद पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गुत्तेदाराने केलेल्या पथदिव्याच्या कामाबाबत साशंक्ता    निर्माण झाली असल्याच्या प्रतिक्रिया विकास प्रेमी नागरिकांच्या चर्चेतून पुढे आली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी