दहावीच्या परीक्षेचा निकाल

हुजपा व राजा भगीरथचे विद्यार्थी समान गुण घेऊन तालुक्यातून प्रथम 


हिमायतनगर(अनिल मादसवार)महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (१७ जून) दुपारी एक वाजता ऑनलाइन -वरून जाहीर झाला असून, यात हिमायतनगर तालुक्यातील हुजपाची कु.पूजा निम्मेवाड या विद्यार्थिनीने ९४ टक्के आणि राजा भगीरथ विद्यालयाचा प्रतिक महेश मारुड्वार या विद्यार्थ्याने ९४ टक्के समान गुण संपादन करून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. 

प्रती वर्षाप्रमाणे यावर्षी तालुक्याचा निकाल म्हणावा तसा लागला नसल्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या निकालात राजा भगीरथ शाळेचा विद्यार्थी अनिकेत शक्करगे ९१.४ टक्के, अविनाश पवार ९० टक्के, प्रथमेश प्रमोद मुक्कावर ८९ टक्के, प्रणव कागणे ८८ टक्के गुण मिळविले आहे. तर हुजपा शाळेतील धनश्री जगदीश चेलमेलवार ९३.८० टक्के , सोनम अनिल अंडगे ९२.६० टक्के, स्नेह रामदास केंद्रे ९१.८० टक्के, अनुप्रिया यशवंत पोपलवार हिने ९० टक्के, कीर्ती कल्याण चेलमेलवार ८९.२० टक्के गुण संपादन केले आहे. तालुक्यातील इतर शाळांमध्ये परीक्षा दिलेल्या इयत्ता दहावीचा निकाल पुढील प्रमाणे आहे. परमेश्वर विद्यालय विरसनी ८६.२ टक्के, हुजपा कन्या शाळा हिमायतनगर ८३.०८ टक्के, कै.चांदराव राउत आश्रम शाळा महादापूर ८३.८७, कै.श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम बु.८३.६ टक्के, हुजपा विद्यालय खडकी बा. ७१ टक्के, मनीषा आश्रम शाळा पोटा बु.४८.९३ टक्के, कै.महादजी पाटील कांडली ४० टक्के, राजा भगीरथ विद्यालय धानोरा ७३.६८ टक्के, जी.प.कामारी ५८ टक्के, जी.प.जवळगाव ६० टक्के, जी.प.हा. हिमायतनगर ३९.६२ टक्के, आश्रम शाळा दुधड -३७ टक्के, एकघरी आश्रम शाळा - ८४.६१ टक्के, बालाजी माध्यमिक विद्यालय, हिमायतनगर ५९ टक्के असा निकाल जाहीर झाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी