मिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले

अशोकराव चव्हाण यांच्या मिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले
मनपाच्या सहाय्यक आयुक्तांनी केली होती तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)अशोकराव चव्हाण यांच्या रॅलीतील दाखल झालेला गुन्हा एक अजब पद्धतीने दाखल करण्यात आला असला तरी यातील आरोपींना शोधून त्यांना अटक करू असे अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले.

26 मार्च रोजी लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी वर्कशॉप कॉर्नर ते जुना मोंढा अशी रॅली काढली.या रॅलीला मुख्य रस्त्यावरून विशेष करून शिवाजीनगर उड्डाण पुलावरून परवानगी मिळाली हा एक वेगळा विषय आहे.या रॅलीत कॉंगे्रस कार्यकर्त्यांनी उत्साहात ठिकठिकाणी फटाके वाजविले.

वजीराबाद भागात एक 45 वर्षीय महिला निर्मलाबाई नामदेव कोटुरवार यांच्या डोळ्यात एक फटाका लागला त्यामुळे त्यांच्या डोळ्याला इजा झाली.त्यांच्यावर उपचार झाले आणि त्या घरी गेल्या.अशोकराव चव्हाण यांची मिरवणूक जुना मोंढा येथे सभा झाल्यावर जवळपास दुपारी 3 वाजता संपली.त्यानंतर रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी वजीराबाद पोलिस ठाण्यात मनपाचे सहाय्यक आयुक्त अविनाथ उमाकांत अटकोरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 55/2014 दाखल झाला.या तक्रारीत असे म्हटले आहे की,श्री.अशोकराव चव्हाण यांचे उमेदवारी निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीत तीन ते चार अज्ञात इसमांनी सार्वजनिक ठिकाणी,निष्काळजीपणे नागरिकांना अपाय होईल अशा पद्धतीने फटाके वाजविले.त्या एक महिला जखमी झाली आहे.हा गुन्हा दाखल होवून तपास पोलिस उपनिरीक्षक तात्या भालेराव यांच्याकडे देण्यात आला. 

या गुन्ह्यात सर्वात मजेशीर बाब अशी आहे की,ज्या निर्मलाबाई कोटुरवार जखमी झाल्या आहेत त्यांचा जबाब सुद्धा प्रथम खबरी अहवालासोबत जोडण्यात आला आहे.त्यात निर्मलाबाई कोटुरवार आपल्याला झालेल्या जखमेबाबत कोणालाही दोषी मानत नाहीत.हा जबाब कोणी घेतला,कधी घेतला याची काहीच नोंद त्या जबाबावर नाही.27 मार्च रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत या गुन्ह्या संबंधाने विचारणा केली असता अपर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले होते की,या प्रकरणातील आरोपींना शोधून आम्ही पकडू असे सांगण्यात आले होते.

त्यानुसार आज वजीराबाद पोलिसांनी अमोल केशव वाढवे,शेख सादुल्ला शेख अमीर आणि संतोष धोडींबा गाजेवार या तीन आरोपींना पकडले असून,या गुन्ह्यातील कलम 285,337 हे जामीनपात्र कलम असल्याने त्यांना जामीन पण देण्यात आला आहे.

या प्रकरणातील जमखी महिला तक्रार नाही असे म्हणत असतांना मनपाचे सहाय्यक आयुक्त खोटे ठरू नयेत म्हणूनच या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असावी अशी चर्चा होत आहे.अशोकराव चव्हाण यांच्या मिरवणुकीतील हा प्रकार कागदोपत्री आणून निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या गळ्यात ही घंटा टाकून टाकली असे मानले जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी