" गुढीपाडवा " दिनी रंगला टेंभीत डाव

अतिवृष्टी, नापिकी, गारपिटीचे दुखः विसरून शेतकर्यांनी रंगविला कुस्त्यांचा फड
" गुढीपाडवा " दिनी रंगला टेंभीत डाव

हिमायतनगर(अनिल मादसवार)गुढीपाडवा म्हणजे शेतकऱ्यांचे नवीन वर्ष... या दिवशी काळ्या आईची पूजा करून शेतकरी नवीन वर्षात शेती कामाला लागतात. याच दिवशी शेतात पुरण पोळीचे जेवण बरेच शेतकरी देतात. हीच प्रथा खेडे गावातील असो व शहरी भागातील शेतकरी आजही परंपरे नुसार जगतो. हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी येथे सालाबाद प्रमाणे शेतातील तसा झाले कि, रंगतो तो.." कुस्त्यांचा डाव " निसर्गाने केलेला कोप असो..वा कर्जाचा सावकारी फास ...हि सारी दुखः विसरून कुस्त्यांच्या आखाड्यात आज शेतकरी रममाण झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

टेंभी हे गाव तसे आदर्श सर्व जाती धर्माचे लोक येथे आनंदाने व गुण्यागोविंदाने नांदतात. धार्मिक सन, उत्सव येथे विना पोलिस पार पडतो. गणपती उत्सव असो, मोहरम असो वा भीम जयंती सर्व समाजातील नागरिक एकमेकांच्या कार्यक्रमात उत्सफुर्थपणे सहभाग नोंदवितात. कारण येथील गुरुदेव सेवा मंडळाचे परमेश्वर अक्कलवाड यांचा सार्वजनिक कार्यक्रमात हिरीहीने सहभाग असतो. अन तुकडोजी महाराजांच्या विचारांचा पगडा गावागावाशी जागवा... भेद भाव समूळ मिटवा... उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे... या विचाराने पेरीत होऊन गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांसह तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात प्रभावित असल्याने कोणत्याही धार्मिक उत्सवात कोणाचीही तक्रार नसते.

गुढीपाडवा शेतकऱ्यांचे नवीन वर्ष आज प्रारंभ झाले...याच दिवशी टेंभी येथे रंगला तो कुस्त्यांचा डाव आपले दुखः आपल्या वेदना विसरून येथील तरुणाई रंगते ते कुस्त्यांच्या आखाड्यात एकीकडे राजकीय आखाड्यात चालू असलेले रणकंदन येथे मात्र त्याचा मागमुसही दिसून येत नाही. पंचक्रोशीतील पैलवानांनी मात्र आज कुस्त्यांचा आनंद लुटला आणि नवीन वर्षाची सुरुवात केली ति कुस्त्यांच्या आखाड्यातून.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी