लोकसभेची उमेदवारी हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी

अशोक चव्हाणांवर लोकसभेची उमेदवारी देणे हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी 


नांदेड(अनिल मादसवार)आदर्श घोटाळ्यातील अशोक चव्हाणांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस सरकारने दिले होते. परंतु त्यांना लोकसभेचे तिकीट देणे हिच कार्यवाही आहे काय..? देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानाच्या विधवा महिलांच्या नावे आलेली घरे लुटून आपली तुंबडी भरली. या महिला व जवानांना लुटणाऱ्या आरोपींना आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोणताही भेदभाव न करता दोषी व भ्रष्ठ आमदार - खासदारांवर कडक कारवाई केली जाईल. असे अभिवचन श्री गुरु गोविंदसिंग यांच्या पावन भूमीची शपथ घेऊन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दिले. ते नांदेड लोकसभा उमेदवार डी.बी.पाटील व हिंगोली लोकसभा उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ गुरुगोविंद सिंघ स्टेडीयमच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते. यावेळी मंचावर गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रिपाई नेते रामदास आठवले, खा.चंद्रकांत खैरे, खा.रावसाहेब दानवे, खा.सुभाष वानखेडे, डी.बी.पाटील, आ.संजू उर्फ बंडू जाधव यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलताना ते म्हणाले कि, काँग्रेसचा काळा पैसा विदेशातील बैन्केत आहे. ते काळेधन परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ज्यांनी नियमित कर भरला असेल त्यांना काळ्यापैशातील थोडी रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येईल. काँग्रेस दिल्लीला बलात्काऱ्यांची राजधानी बनवत आहे. निर्भया योजनेसाठी तरतूद करण्यात आलेला पैसा महिलांसाठी खर्च करण्याचे सांगून, काँग्रेस या रक्कमेची लूट करत आहे. म्हणून सुजन मतदारांनी देशाला लुटणाऱ्यांना साफ करून शेतकरी, मजूरदार, युवकांसह देशहितासाठी महायुतीला मतदान करा असे अवाहणहि त्यांनी केले. यावेळी मोदींचे भाषण ऐकण्यासाठी नांदेड, हिंगोली जिल्यातील ग्रामीण भागातून लाखोच्या संखेने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित झाले होते. एका एका वाक्यानंतर मोदी..मोदी... असा नावाचा जय जयकार करण्यात आल्याने संपूर्ण नांदेड परिसर दणाणून निघाला होता.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी