नववर्षाची मुहुर्तमेढ

गुढया-तोरणे बांधुन बळीराजाने केली नववर्षाची मुहुर्तमेढ


हिमायतनगर(अनिल मादसवार)नांदेडजिल्ह्यातील ग्रामीण परिसरात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बळीराजाने पारंपारिक पद्धतीने काळ्या आईची पूजा अर्चना करून नववर्षाची मुहूर्तमेढ रोऊन शेती कामांना प्रारंभ केला. तर ग्रहीनिनी घरी उंच गुढी उभारून घरा - दाराला आंब्याचे तोरण बांधून शेजारच्यांना गोड जेवण देवून वनभोजनाचा आनंद लुटल्याचे चित्र, चैत्र शुद्ध एकादशी दि.३० मार्च रोजी सर्वत्र दिसून आले आहे.

भारत हा कृषीप्रधान देश असुन, या देशातील शेतकरी कष्टकरी असल्याने सर्वात जास्त धान्याची संपत्ती असलेला देश म्हणुन ओळखला जातो. वयोवृद्द जानकारच्या रुढीपरंपरेनुसार व श्रीरामाने रावणाचा वध करुन मिळवीलेला विजय व आयोध्येला परत आलेला दिवस म्हणुन गुढीपाढवा सन होय. 14 वर्षाच्या वनवासनंततर प्रभुरामचंद्र घरी परतले म्हणन तमाम जनतेनी घरो-घरी गुढया तोरणे उभारुन मोठ्या उत्साहात स्वागत केले, तोच दिवस गुढीवाडवा म्हणुन आजही साजरा केला जातो. या नवीन वर्षात शेतकरी आपल्या शेतीच्या अवजारांची पुजा करुन सर्व कामाला सुरुवात करतात. चैत्र शुध्द प्रतीपदेला शेतातील धन-धान्य घरात आल्याच्या आनंदाने घरा-घरात गुढ्या तोरणे उभारुन गृहलक्ष्मीच्या हस्ते गुढीची पुजा केेली जाते.साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असल्यामुळे अनन्य साधारण मंहत्व असलेल्या मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात यशश्री, आरोग्य, मांगल्य, माधुर्य, वैभव, सामर्थ, संकल्प, सौभाग्य, सिध्दी, स्थैर्याची गुडी - तोरणे उभारुन बळीराजाने मुहुर्तमेढ साधल्याचे चित्र हिमायतनगर शहर व ग्रामीण परिसरासह नांदेड जिल्हयात पहावयास मिळले.

इतीहासाच्या काळात शालीवाहन नावाच्या कुंभार समाजाच्या राजाने मातीचे सैनीक तयार केले. सैनीकांत रणशींग फुंकुन परकीय आक्रमकांना पिटाळुन लावले, त्यांच्या नावे शालीवाहनशके सुरु झाले. तो दिवस म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस होय? असा उल्लेख इतिहासात असुन हा राजा मराठावाड्यातील पैठण येथील असल्याचाही उल्लेख केल्याचे दिसते. त्यामुळे हिंदु संस्कृतीच्या शालीवाहनशके अनुसार भारतीय नववर्षाची कालगनणा सुरुवात झाली. या दिवशी शेतकरी आपल्या शेतीच्या कामास प्रारंभ करण्यापुर्वी शेजारी - पाजारचे शेतकरी व कुटुंबांना आमंत्रन देऊन काळ्या आईची पुजा- अर्चना, नैवेद्या दाखऊन गोडजेवन देतात. तसेच शेती कामांना आडच्या दिनी तास करुन सुरुवात करतात. याच दिवशी आरोग्याच्या दृष्टीने लाभादायक ठरावे म्हणुन कडु - गोड औषधी चांगली असते. म्हणुनच कडुलिंबाचा फुलोरा, कैरी, चिंच, गुळ, जिरे आदिचे मीश्रण करुन जेवनाअगोदर सेवन केले जाते. गुढीपाढव्याच्या महुर्तावर उन्हाची तिव्रता वाढली असली तरी, इश्वर भक्तीच्या ओढीने महीला-पुरुष भावीक-भक्तांनी उन्हाची तमा न बाळगता शहरातील मंदिरांना हजेरी लाऊन दर्शन घेतले.

या मराठी नववर्षाच्या दिवसापासुन रामनवमी, हनुमान जयंती, महाविर जयंती आदिंसह विविध मराठी सनांची रेलचेल सुरु होते.तसेच वसंत ऋुतुच्या आगमनाने जंगल परिसरातील झाडांची पानगळी होऊन वृक्षांना नवी पालवी फुटते. परिसरातील काही वृक्ष नव्या पालवीने बहरल्यामुळे ते वृक्ष वाटसरुंचे लक्ष वेधुन घेत आहेत. तसेच चाफा, गुलमोहर, काटशेवरी, पळसफुले, गणेरी, शेवंती, पांगरा, गुलाब आदिंसह रंगीबेगंरी फुलांची झाडे बहरल्यामुळे वसंत ऋतुने भर-भरुन निघल्याचे चित्र पाढव्याच्या मुहुर्तावर दिसुन आले आहे.​

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी