मोदींना पंतप्रधान करण्यासाठी खा.सुभाष वानखेडेना निवडून आना...नागेश पाटील
हिमायतनगरात महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
हिमायतनगर(वार्ताहर)देशाला नरेंद्र मोदिसारख्या विकासाभिमुख नेतृत्व मिळून देण्यासाठी खा.सुभाष वानखेडे यांना निवडून आणावे लागणार आहे. त्यासाठी सर्व लहान - मोठ्या कार्यकर्त्यांनी आळस झटकून कामाला लागा असे आवाहन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे युवा नेते नागेश पाटील आष्टीकर यांनी केले. ते हिमायतनगर येथे आयोजित महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर बाबुराव कदम, शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉक्टर प्रकाश वानखेडे, विजय नरवाडे, भाजपचे राज्य सदस्य प्रकाश अण्णा तुप्तेवार, पांडुरंग कोल्हे मामा, आठवले गटाचे शाहीर बळीराम हनवते, बाळू चवरे, कांतागुरु वाळके, विजय नरवाडे, राजीव बंडेवार, यलप्पा गुंडेवार, आदेश श्रीश्रीमाळ, माजी.जी.प.सदस्य संभाराव लांडगे, शामराव चव्हाण, बंडू पाटील आष्टीकर, पत्रकार संजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, आघाडी सरकारच्या महागाईच उच्चांक वाढला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास ते असमर्थ ठरले. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांवर खरीप व रब्बी हंगामात दोन वेळा निसर्ग कोपला, परंतु त्यांना मदत करण्यात शासन असमर्थ ठरला आहे. शासनाचे कुचकामी धोरण व स्वार्थी वृत्तीला आता जनता कंटाळली आहे. भारताला महासत्ता बनवून गरिबातला गरीब माणसाला सुख - समृद्ध करण्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकहाती सत्ता व नरेंद्र मोदी सारख्या पंतप्रधाना पदाच्या नेतृत्वाची आज देशाला गरज आहे. करिता सर्व कार्यकर्त्यांनी खा.सुभाष वानखेडे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी मेहनत करा असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी विवेक देशमुख, सत्यव्रत्त ढोले, विठ्ठलराव वानखेडे, विजय वळसे, रामभाऊ ठाकरे, रवींद्र दमकोंडवार, जाफर भाई, गजानन तुप्तेवार, साहेबराव चव्हाण, जावेद खातीब, हनुसिंग ठाकूर, रामराव पाटील, राजेश्वर रायेवार, चांदराव वानखेडे, विलास वानखेडे, राम नरवाडे, अनिल भोरे, केवलदास सेवनकर, गिरीश महाराज यांच्याश हजारो शिवसैनिक, आठवले गट, स्वाभिमानी शेतकरी उपस्थित होते.