स्वारातीम विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १७ जानेवारीला
पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांना डी. लिट. देऊन सन्मानीत करणार
नांदेड(सुरेश कुळकर्णी)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारंभ शुक्रवार दि. १७ जानेवारी २०१४ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत मंचावर संपन्न होणार आहे. समारंभाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल के. शंकरनारायणन हे भूषविणार असून सदर समारंभास पंजाब राज्याचे राज्यपाल शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर हे प्रमुख अतिथी म्हणून दीक्षांत भाषण करणार आहेत. ना. डी. पी. सावंत, उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नांदेड व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार असून सदरील कार्यक्रमात शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर, पंजाब राज्याचे राज्यपाल तथा माजी गृहमंत्री, भारत सरकार यांना डी. लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. ........