पशु संवर्धनासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा..प्रकाश राठोड
नांदेड(अनिल मादसवार)पशुधनांच्या संवर्धनासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान जी.प.चे उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रकाश राठोड यांनी केले. ते कंधार तालुक्यातील बाचोटी येथील खंडोबा यात्रेतील पशु प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रस्नागी बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एम. यू.गोहोत्रे, कृषी विकास अधिकारी एम.टी.गोंडेस्वार, सरपंच बालाजी घोडगे, कृषी अधिकारी व्ही.जी. अर्धापुरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रोळे, कृषी अधिकारी ए.व्ही.अंचलवाड, चेअरमन आनंदराव धोंडगे, यात्रा समितीचे अध्यक्ष रघुनाथ पाटील धोंडगे, एड.विजय धोंडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. ......