माहूर गडावर रेणुकामातेचा नवरात्रोत्सव सुरु..
पन्नास हजार भाविकांनी घेतले दर्शन
नांदेड(सुरेश कुलकर्णी)देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ असलेल्या माहूरच्या नवरात्रोत्सव आज सकाळी अकरा वाजता घटस्थापनेने सुरु झाला. रेणुकामातेला संपूर्ण स्नान घालून व शोडोपचारे पुजून आज पुरणाची पोळी व पायसाचा नैवैद्य दाखविण्यात येतो व देवीची आरती होते.यावेळी सहायक जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी हेही उपस्थित होते. आज देवीच्या दर्शनासाठी सुमारे ५० हजार भाविक आले होते. सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.सायंकाळी सहा वाजेपर्यंत उघाड होती नंतर मात्र पाउस सुरु झाल्याने भक्तांना त्याचा त्रास झाला.