विश्वकर्मा दुर्गा मंडळासमोर दुर्गा सहस्त्रनामजप सुरु ...नऊ दिवसात विविध कार्यक्रमांची धूम
हिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील गणेश चौकात स्थापन करण्यात आलेल्या विश्वकर्मा दुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून, दि.०६ रविवार पासून मंडळाच्या पेंडलमध्ये शेकडो महिला मुलीनी दुर्गा सहस्र नाम जपत सहभाग घेतल्याने परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थिती दर्शवून शोभा वाढवावी असे आव्हान संयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.