नवरात्रात देवीची उपासना शास्त्रानुसार करा !
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीच्या काळात श्री दुर्गादेवीचे तत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते. देवीच्या उपासनेमागील शास्त्र जाणून घेऊन तिच्या उपासनेअंतर्गत विविध धार्मिक कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्यरीत्या केल्या, तर आपल्याला श्री दुर्गादेवीच्या तत्त्वाचा जास्त लाभ होऊन देवीची कृपा संपादन करता येईल.
१. श्री दुर्गादेवीची गुणवैशिष्ट्ये
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ।।
अर्थ : सर्व मंगलकारकांची मंगलरूप असणारी; स्वतः कल्याणशिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी, अशा हे नारायणी देवी, तुला मी नमस्कार करतो............
सविस्तर माहितीसाठी पुढील लिंक क्लिक करा...
http://www.nandednewslive.com/detailnews.php?id=3927&cat=Editorial