पूर्णा - पाटणा एक्सप्रेसचे हिमायतनगर स्थानकावर जंगी स्वागत
प्रलंबित मागण्या लवकरच सुटतील ...खा.वानखेडे
हिमायतनगर(अनिल मादसवार)आगामी काळात हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील सर्व समस्या मार्गी लागतील असे आश्वासन खा.सुभाष वानखेडे यांनी दिले. ते पूर्णा - पाटणा एक्सप्रेसला हिमायतनगर येथे थांबा मिळाल्यानंतर प्रथमच स्थानकावर येणाऱ्या पाटणा रेल्वेच्या जंगी स्वागत प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेनेचे युवा नेते नागेश पाटील आष्टीकर, महाविरचंद श्रीश्रीमाळ, माजी. जी.प. सदस्य बाबुराव कदम, सदस्य समद खान, राम राठोड, सत्यव्रत्त ढोले, विजय नरवाडे, जफर भाई, डॉक्टर गणेश कदम, अन्वर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. ...