कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज खुरगावला विविध कार्यक्रमांचे आयोजन -NNL


नांदेड|
तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दरमहा पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कार्तिक पौर्णिमेनिमित्त आज सकाळपासूनच परित्राणपाठ, धम्मध्वजारोहण, त्रिरत्नवंदना, बोधीपुजा, सूत्तपठण, ध्यानसाधना, धम्मदेसना व्याख्यान, भोजनदान, आर्थिक दान पारमिता आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक, आॅल इंडिया भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.

ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित खुरगाव नांदुसा परिसरातील  श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात कार्तिक पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. 

या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री-पुरुष आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक-उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. या निमित्ताने आज १९ नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांसाठी भिक्खू संघासह  विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.  परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी