बिलोली। बिलोली येथील ऐश्वर्या गोविंदराव मुंडकर यांच्या नीट परीक्षेतील यशाबाबत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर- घुगे यांनी उत्साहवर्धकपणे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक नेत्यासह पत्रकार उपस्थित होते.
बिलोली येथील ऐश्वर्या गोविंदराव मुंडकर यांनी नीट या परीक्षेत यश मिळविले. याबाबत माहिती मिळताच जिल्हा परिषद परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांनी उत्साहवर्धकपणे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या थेट संवादातील ऐश्वर्या मुंडकर यांच्या विविध बाबी जाणून घेत असतानाच बिलोली तालुक्यातील शिक्षकांच्या वृक्षारोपण आणि वृक्षांचा वाढदिवस यावेळच्या थेट संवादाच्या कार्यक्रमाची घुगे यांनी उपस्थिताना आठवण करून दिली. धावपळ आणि प्रकृती अस्वस्थ असतानाही उत्साहावर्धकपणे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन ऐश्वर्या मुंडकर यांना प्रोत्साहित केले. यावेळी शिक्षक नेते संजय कोठाळे आदी उपस्थित होते.