दैनिक नवभारत टाईम्सने विश्वसनीयता जपून वाचकांच्या मनात स्थान मिळवले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL


मुंबई|
समाजाच्या जडणघडणीत माध्यमांचे योगदान मोठे असते. दैनिक नवभारत टाईम्सने विश्वसनीयता जपून वाचकांच्या मनात स्थान मिळवले आहे असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

हिंदी दैनिक नवभारत टाईम्स आयोजित ‘एनबीटी उत्सव 2022’ कार्यक्रम हॉटेल सहारा स्टार येथे झाला. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, श्री शिवकुमार सुंदरम, नवभारत टाईम्सचे संपादक सुंदर चंद ठाकूर, किशन पोद्दार तसेच मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माध्यमांची जबाबदारी खूप मोठी असते. वस्तूनिष्ठ माहिती पोहोचवणे गरजेचे असते. नवभारत टाइम्स हे वृत्तपत्र पत्रकारितेत अग्रणी दैनिक असून 72 वर्षांत दैनिकाने विश्वसनीयता मिळवली आहे व सोशल मिडियाच्या आजच्या युगात ही विश्वसनीयता टिकवून ठेवली आहे हे देखील तेवढेच महत्त्वाचे असल्याचेही श्री फडणवीस यांनी सांगितले. संपादक सुंदर चंद ठाकूर म्हणाले, नवभारत टाइम्स 72 वर्षापासून कार्यरत असून विश्वसनीयता टिकवून आहे. मुंबईतील हिंदी भाषक वाचकांच्या पसंतीचे हे अग्रेसर वृत्तपत्र आहे. सकारात्मक पत्रकारितेवर वृत्तपत्र भर देत असल्याचे श्री ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेत्री रविना टंडन, जान्हवी कपूर, शिल्पा शेट्टी, रकुल प्रीत, मृणाल ठाकूर, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, डॉ हंसाजी योगेंद्र, डॉ अतुल गोयल, नीरजा बिर्ला, उद्योजक फिरोजशहा गोदरेज, गायिका डॉ सोमा घोष, बासरीवादक पारस नाथ, संगीतकार अमित त्रिवेदी, सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी, बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी अभिनेत्री शबाना आझमी यांनी कैफी आझमी यांची गझल ऐकवली. पारस नाथ यांचे बासरीवादन झाले. यानंतर डॉ सोमा घोष यांनी गझल, ठुमरी व कजरी सादर केली. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी