नांदेड| तालुक्यातील सोमेश्वर येथे श्रम साफल्य ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या वतीने नांदेड उत्तर मतदारसंघांमध्ये सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर यांच्या वतीने शेतकर्यांना अनुदानित हरभरा वान जाकी 92 18 व फुले विक्रम बियाण्याचे वाटप गावात गाडीत आणून घरपोच शेतकर्यांना बियाणाचे वाटप करण्यात आले या कंपनीने शेतकर्यांना आठ दिवसापूर्वी नाव नोंदणी करून घरपोच बियाणे वाटप करण्यात आले.
नांदेड उत्तर मतदारसंघात महिलांचे बचत गटाचे जाळे निर्माण केले असून त्यांचा मोठा महिलावर्ग निर्माण केला असून या भागामध्ये 57 बॅक चे वाटप करण्यात आले. यामुळे शेतकर्यांचे बाजारभावापेक्षा सातशे ते आठशे रुपये शेतकर्यांना फायदा झाला असून सौ.संध्याताई बालाजीराव कल्याणकर बोलताना म्हणाले की, श्रम सापडले शिवालय ऍग्रो कंपनीच्या वतीने शेतकर्यांना यापुढेही खते बियाणे व कीटकनाशक औषधांचाही बाजारभावापेक्षा वाटप करण्यात येणार असून शेतकर्यांनी जास्तीत जास्त या कंपनीत नाव नोंदणी करून आपली सभासद करून शेतकर्यांनी कंपनीच्यावतीने बियाणे खते वाटपाचा लाभ घ्यावा असे ते म्हणाल्या.
या कार्यक्रमाला शिवसेना सर्कल प्रमुख गणेश बोकारे, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर बोकारे, पत्रकार आनंदा बोकारे, उद्धव बोकारे, रामराव बोकारे, कैलास बोकारे, आनंदराव बोकारे, कपिल वानखेडे, अनिरुद्ध कदम, शिवम पवार, चंद्रकांत पावडे, लक्ष्मण कल्याणकर, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.