लोहा| शहरात नेहमीच आर्य वैश्य समाजाने सामाजिक उपक्रम राबविले आहेत आर्य -वैश्य समाज महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी १३ नोव्हेंबर रोजी लोह्यात समाजाच्या वतीने चिंतामणी गणपती मंदिर मोंढा लोहा येथे आयोजित करण्यात आले आहे
आर्य वैश्य समाज महासभेचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमारजी गादेवार याचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने राबविण्यात येत आहे .लोह्यातील आर्य वैश्य समाज बांधवांनी एकत्रित येत श्री गादेवार यांच्या वाढदिवसा निमित्य 13 नोव्हेंबर रविवारी लोहा शहरात रक्तदानाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण केलेल्या रक्तदानाने चार व्यक्तींचे प्राण वाचतात. एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवल्याचा जो आनंद आपणास मिळतो त्याचे मूल्य होऊ शकत नाही ते अमूल्य असते म्हणूनच सर्वांनी रक्तदान जरुर करावे.
चला रक्तदान करुया,नाती घट्ट करू - रविवार-सकाळी 9 ते 2 या वेळात - चिंतामणी गणपती मंदिर मोंढा लोहा. रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत रक्तदात्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आर्य वैश्य समाज व आर्य वैश्य महासभेच्या वतीने करण्यात आले आहे