गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांसह चौघांचा समावेश -NNL


नवी दिल्ली|
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, काँग्रेस अध्यक्ष व गांधी कुटुंबासह देशभरातील प्रमुख नेत्यांचा या यादीत समावेश आहे.

एकूण ४० प्रचारकांच्या या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तिसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग व कमलनाथ, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश आहे. महाराष्ट्रातून चव्हाण यांच्या व्यतिरिक्त माजी मंत्री शिवाजीराव मोघे, नसिम खान व रामकिशन ओझा यांचा या यादीत समावेश आहे.

१८२ सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी येत्या १ व ५ डिसेंबरला २ टप्प्यात मतदान होणार असून, मतमोजणी ८ डिसेंबरला होईल. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत रमेश चेन्नीथला, तारिक अन्वर, बी.के. हरिप्रसाद, मोहन प्रकाश, शक्तिसिंग गोहिल, डॉ. रघू शर्मा, जगदीश ठाकोर, सुखराम राठवा, सचिन पायलट, भरतसिंग सोलंकी, अर्जुन मोडवाडिया, सिद्धार्थ पटेल, अमित चावडा, नरेनभाई राठवा, जिग्नेश मेवानी, इम्रान प्रतापगढी, कन्हैय्या कुमार, कांतिलाल भुरिया, राजेश लिलोथिया, परेश धनानी, विरेंदरसिंग राठोड, उषा नायडू, बी.एम. संदीप, अनंत पटेल, अमरिंदरसिंग राजा व इंद्रविजयसिंग गोहिल यांचाही समावेश आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी