नांदेड। नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान डॉ. बालाजी पेनुरकर शिवसेना जिल्हा प्रवक्ता यांनी केले आहे.
मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून जनआंदोलन सुरू केले असून या यात्रेला देशात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात राहुल गांधी यांची यात्रा दि.७ नोव्हेंबर रोजी दाखल झाली असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे . खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत नांदेड जिल्ह्यातील सभेला शिवसेनेचे युवा नेते माझी पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे हे सहभागी होणार आहेत.
भारत जोडो यात्रेत लाखोच्या संख्येने शिवसैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रवक्ता डॉ. बालाजी पेनुरकर यांनी केले आहे. भाजप सरकार धर्माधर्मामध्ये एकमेकाविषयी तेढ निर्माण करत आहे. वर्षानुवर्ष बंधू भाऊंनी राहणारे लोक सरकारच्या कूटनेतेमुळे एकमेकापासून दरावर चालले आहेत.
नोटबंदी करून आणि जीएसटी लावून सरकारने देशातील खाजगी क्षेत्र ,शेतकरी, लहान व्यापारी संपून टाकण्याचा डाव रचला असून केवळ आपल्या काही व्यापारी मित्रांना मोठे करण्यासाठी हे सरकार सामान्याच्या मुळावर उठले आहे हे सरकार देशाच्या हिताचे नसून सरकार वैयक्तिक द्वेष पसरविणारे आहे. यावेळी नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सुनिल पाटील कदम,माजी नगरसेवक आनंद जाधव,नवनाथ पाटील जोगदंड, बाबासाहेब जोगदंड यांची उपस्थिती होती.