औरंगाबाद| केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार, दि.19 नोव्हेंबर, 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि.19 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 09.15 वा. नागपूर विमानतळ येथून विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. 10.00 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. 10.30 वा. औरंगाबाद विमानतळ येथून मोटारीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादकडे प्रयाण. 11.00 वा. ते 12.45 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित ६२ वा वार्षिक दीक्षांत समारंभास उपस्थिती. (स्थळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद).
दुपारी 12.45 ते 01.30 वा. राखीव (विद्यापीठ परिसर, औरंगाबाद). 01.30 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. 01.50 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. 2.00 वा. औरंगाबाद विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अहमदनगरकडे प्रयाण. सायंकाळी 05.10 वा. अहमदनगर येथून हेलिकॉप्टरने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. 5.40 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. 05.45 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विशेष विमानाने नागपूरकडे प्रयाण.