नांदेड। दिनांक 09 नोव्हेंबर 2022 रोजी नांदेड जिल्हा कार्यालय राज्य समन्वयक मराठवाडा विभाग तथा सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त स्काऊट श्री. गोविंद केंद्रे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षण अधिकारी प्राथमिक श्रीमती सविता बिरगे मॅडम,जिल्हा स्काऊट संघटक श्री जनार्दन इरले, जिल्हा गाईड संघटक श्रीमती शिवकाशी तांडे, श्री परमेश्वर बनसोडे श्रीमती अनुराधा कोटपेठ श्री संजय गुडलावार इत्यादी कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री गोविंद केंद्रे यांनी जिल्हा कार्यालय यांचा शैक्षणिक वर्षातील कार्याचा आढावा घेत उद्दिष्ट पूर्ती बाबत उत्साहवर्धक सखोल मार्गदर्शन केले, तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित जांभोरी याबाबत जिल्हा कार्यालयाला मिळालेला कोटा व कार्यक्रम सादरीकरणा बाबत सूचना दिल्या. यावेळी जिल्हा कार्यालयाने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देत दिलेल्या भेटीबाबत आभार मानले. याप्रसंगी शिक्षण विभाग नांदेड येथील अधिकाऱ्यांच्या समक्ष स्थापना दिनानिमित्त चळवळीच्या ध्वजदिन स्टिकर्स चे अनावरण करण्यात आले.