आरोग्य सेविका मनिषा जाधव यांचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान -NNL

श्रीमती मनिषा जाधव यांचा प्रवास गाथा आणि अल्प परिचय :

नाव- श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव, मोबाईल ९५०३९७१७७१, आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरोची. उपकेंद्र धर्मपुरी. ता. माळशिरस. जि. सोलापूर पिन .४१३१०९ येथे कार्यरत आहेत.


श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव मागील १८ वर्षा पासून आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेविका म्हणून आरोग्यसेवा अविरतपणे निभावत आहेत. दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना " राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटींगल पुरस्कार २०२१ " या सर्व उत्कृष्ठ पुरस्काराने आपल्या देशाचे नवनिर्वाचित महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. दि. १२ मे १८२० हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिवस. संपूर्ण आयुष्य त्यांनी आरोग्य सेविका म्हणून आरोग्य सेवेत घालवले. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ दि.१२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये " जागतिक परिचर्या दिन " म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारत सरकार द्वारे प्रत्येक वर्षी उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य परिचारिकेस " फ्लोरेन्स नाइटिंगेल " यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्य पुरस्कार बहाल केला जातो.

आरोग्य सेवेतील चांगले काम पाहून श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव यांची नुकतीच देशपातळीवरील दिला जाणारा " नॅशनल फ्लोरेन्स नाइटिंगेल " पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झाली होती आणि हा पुरस्कार महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यामध्ये सन्मानपत्र, पदक आणि रोख रक्कम ₹ ५०,०००/- रुपये देवून गौरवण्यात आले. ग्रामीण भागातून शिक्षण घेवून आपल्या उत्कृष्ठ कामातून राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र होणे ही बाब खर तर सोलापूर जिल्ह्यासाठी साठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण प्रथमच आरोग्य विभागातून सोलापूर जिल्हा मधून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


श्रीमती मनीषा भाऊसाहेब जाधव यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांच्या गुरसाळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या जन्मगावी पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कामा आणि अल्बलेस रुग्णालय मुंबई या ठिकाणावरून १८ महिन्याचे एएनएम चे प्रशिक्षण सन २००२ वर्षी पूर्ण केले. त्यानंतर महानगरपालिका सोलापूर येथे आरोग्य विभागामध्ये २००३ ते २००४ या दरम्यान आरोग्य सेविका या पदावर त्यांनी काम केले. 

त्यानंतर सन २००५ मध्ये  त्यांची निवड जिल्हा परिषद सोलापूर यांचे कडून आरोग्य सेविका या पदासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी, तालुका माळशिरस या ठिकाणी करण्यात आली आणि आज त्या प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोची, उपकेंद्र धर्मपुरी जिल्हा सोलापूर याठिकाणी कार्यरत आहेत. आरोग्य सेवेतील काम करत असताना त्यांनी स्वतःचे पुढील शिक्षण चालू ठेवले. आज त्यांनी पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण करून पुढील पदवीतर शिक्षण चालू ठेवले आहे. त्याशिवाय कामा आणि अल्बालेस रुग्णालय मुंबई या ठिकाणी सन २०१७  मध्ये आरोग्य सेवेतील एलएचवी चे ६ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्या ठिकाणी ७ जिल्ह्या मधून प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्या. त्याशिवाय त्या करत असलेल्या आरोग्य सेवेतील चांगल्या कामामुळे अनेक वेळा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.


त्यांना तालुका पातळीवरती  सन २०१३ आणि २०१४ मध्ये "कुटुंब-नियोजन शस्त्रक्रिये" मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सलग दोन्ही वर्षे " प्रथम क्रमांक" मिळाल्याचे प्रमाणपत्र त्यावेळेचे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम कासार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. त्यांनी सन २०१७ मध्ये "जननी-सुरक्षा योजना" मध्ये उत्कृष्ट काम केल्याने तालुका पातळीवरती त्या करत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक आला होता. त्यासाठी चा पुरस्कार त्यावेळेचे सोलापूर जिल्हा मुख्य कार्यकारी अधीकारी श्री राजेंद्र भारूड यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला होता. त्याशिवाय दि.१२ मे २०१८

रोजी उत्कृष्ट कामाबद्दल  "कामा आणि अल्ब्लेस रुग्णालय मुंबई" यांचे तर्फे दिला जाणारा "आदर्श परिचारिका " हा पुरस्कार देण्यात आला होता. दि.१५ ऑगस्ट २०२० रोजी त्या करत असलेल्या कामाच्या ठिकाणी  " ग्रामपंचायत धर्मपुरी " यांच्या वतीने झेंडा वंदनाचा मान देऊन " कोरोना काळात "  केलेल्या चांगल्या कामाचा सन्मान केला गेला. कोरोना काळामध्ये एका दिवशी ४३२ कोरोना टेस्ट आणि तीन दिवसामध्ये ११०० कोरोना टेस्ट केल्या गेल्या होत्या त्याबद्दल " प्राथमिक आरोग्य केंद्र " मोरोची चे वैद्यकीय अधिकारी डॉ.मेहता यांच्या कडून चांगल्या कामाची प्रशंसा केली गेली होती. त्या शिवाय त्या अनेक सामजिक कार्यात भाग घेत असतात.

" श्रीमती मनिषा जाधव, आरोग्य सेविका यांना देशपातळीवरच्या फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान झाला म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. जाधव यांच्या कामामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा देशपातळीवर सन्मान झाला आहे."  - दिलीप स्वामी , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर. 

"सोलापूर जिल्हा आरोग्य विभागासाठी श्रीमती मनिषा जाधव यांचा आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून मला याचा आनंद आहे. श्रीमती मनिषा जाधव यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे आरोग्य विभागाची मान उंचावली आहे."  - डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर.


श्रीमती मनिषा जाधव दरवर्षी दि.१ मे रोजी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्या अनेक सामाजिक संस्थांना काही ना काही मदत करत असतात. ज्या मध्ये गरजू-गोरगरीब, अंध-अपंग शाळा, सामाजिक-शैक्षणिक संस्थांना वस्तू रूपाने अथवा आर्थिक मदत करत असतात.   

त्यांचे पती कै.भाऊसाहेब जाधव यांनी देशाच्या सीमेवरती आर्मी मध्ये सेवा केली होती. त्याशिवाय त्यांचा कारगिल युद्धामध्येही सहभाग होता .आपल्या मुलाने ही देश सेवा करावी यासाठी त्याची डिफेन्स मध्ये निवड होण्यासाठी प्रयत्न करत होत्या. नुकतीच त्यांचा मुलगा साहिल भाऊसाहेब जाधव याची वयाच्या १९ व्या वर्षी डिफेन्स मधील SSB (TES ) कोर्स-४७ बँच मधील  मुलाखती मध्ये निवड झाली आहे. जो आशिया खंडातील सर्वात अवघड  मुलाखत समजली जाते आणि आज त्यांचा मुलगा भारतीय सेनेमध्ये लेफ्टनंट या पदावरती बिहार मधील OTA GAYA या ठिकाणी पुढील प्रशिक्षण घेत आहे.

तरी आरोग्यसेवेतील उत्कृष्ट कामासाठी देशभरा तून प्रत्येक राज्यांमधून या पुरस्कारासाठी वेगवेगळ्या पदावरील ५१ पुरस्कार विजेते निवड करत असताना आपल्या महाराष्ट्र राज्यातून आरोग्य सेविका म्हणुन श्रीमती मनीषा भाऊसाहेब जाधव यांची निवड करण्यात आल्या बद्दल त्यांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती मनिषा भाऊसाहेब जाधव, आरोग्य सेविका यांचा नर्सेस अशोसिएशन दिल्ली व नर्सिंग कॉन्सील दिल्ली यांच्या कडून ₹ ५०,०००/- धनादेश, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र पत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे त्या पुढील भावी आरोग्य विषयक कार्यास व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐

संकलन :- सत्यजीत टिप्रेसवार, नांदेड

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी