रस्ते अपघातातून सुरक्षिततेसाठी जबाबदारीने वाहन चालविणे आवश्यक - शैलेश कामत -NNL

जागतिक स्मरण दिनानिमित्त बसस्थानकात विशेष कार्यक्रम


नांदेड|
रस्ते अपघाताची वाढती संख्या व यात होणारी जीवीत हानी चिंताजनक झाली आहे. रस्त्यावर होणारे  अपघात हे मानवी चुकामुळे अधिक प्रमाणात होतात. अति घाई करणे, वाहनाची वेग मर्यादा न पाळणे, सूचनाचे पालन न करणे आदी कारणामूळे अपघात झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत.   वाहन चालवितांना वाहन चालकांनी रस्ते नियमावलीचे पालन केल्यास अपघाताची संख्या आपण कमी करु शकतो, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. 

नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानक मध्ये आयोजित रस्ते अपघातामध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींचा जागतिक स्मरण दिन कार्यक्रमात ते बोलत होते. दरवर्षी नोंव्हेबर महिण्याचा तिसरा रविवार हा रस्ते अपघातात जीव  गमावलेल्या व्यक्तींसाठी जागतिक स्मरण दिन पाळण्यात येतो.  

अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यादृष्टीने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नियमित शाळा, महाविद्यालय व कॉलेजमध्ये रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृतीच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, असेही शैलेश कामत यांनी सांगितले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी रस्ते सुरक्षेबाबत शपथेचे वाचन केले. अपघातग्रस्तांना आपण स्वत: जीवरक्षक म्हणून स्वयंस्फुर्तीने मदत करण्याबाबत माहिती दिली. 

यावेळी फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने रस्ता सुरक्षेबाबत बसस्थानक व माता गुजरीजी विसावा उद्यान येथे पथनाटयाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, बसस्थानाकातील वाहतूक विभागाचे अधिकारी, वाहनचालक, वाहक, प्रवासी आदींची उपस्थिती होती.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक निरिक्षक यासीन अहमद, आकाश गिते, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल श्रीवास्तव, मोटार वाहन निरीक्षक अमोल आवाड, मंगेश इंगळे, मनोज चव्हाण, सहा. मोवानि श्री. टिळेकर, श्री. रहाणे, श्री. राजूरकर उपस्थित होते. प्रारंभी मेणबत्ती प्रज्वलित करुन रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी