हिमायतनगर| तालुक्यातील मौजे वाईतांडा पोटा तलाव येथे युवा शेतकरी विक्रांत वसंत पवार हा आपले बैल धुण्यासाठी तलावात गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दिनांक 07.11.2022 रोजीचे दुपारी २ वाजेचे पुर्वी हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाईतांडा पोटा तलाव येथे, यातील मयत विक्रांत वसंत पवार, व्यवसाय शेती रा. वाईतांडा ता. हिमायतनगर जि. नांदेड हा आपले बैल धुण्यासाठी तलावात गेला असता तो पाण्यात पडुन मरण पावला आहे.
अशी खबर विनोद सखाराम पवार, वय 32 वर्षे, व्यवसाय शेती रा. वाई तांडा ता. हिमायतनगर जि. नांदेड, यांनी दिल्यावरुन हिमायतनगर पोलीस ठाण्यात आ. मृ.45/2022 कलम 174 सीआरपीसी कायदा प्रमाणे नोंद करण्यात आली असुन, तपास सपोउपनि श्री कदम, मो.नं. 7350671239 हे करीत आहेत.