उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील उस्माननगर येथील बसस्थानक जवळच रोडचे काम निकृष्ट दर्जाचे व मनमनी विचाराने अरुंद करीत असल्याचे सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे केली आहे.
दि.२ नोव्हेबर रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मौजे उस्माननगर ता. कंधार येथून बिदर ला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील नालीचे काम मनाप्रमाणे अरुंद व निकृष्ट दर्जाचे होत आहे.गोरगरीब नागरिकांचे शंभर फुट मधील घरे पाडली , मोठ्या इमारती पाडण्यात आले. सदरील काम करणाऱ्या ठेकेदाराकडून कुचूसी होत असल्याचे दिसून येत आहे. पंचेचाळीस ते पन्नस फुटावर गावातील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन व विद्युत खांब टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते.आणि त्या पाइपलाइन लगत रोडकडून नालीचे काम मनाप्रमाणे करण्यात आले आहे.
उस्माननगर हे गाव दहा ते पंधरा हजार लोकसंख्येचे गाव आहे.तसेच येथील मोठी बाजारपेठ व पोलीस स्टेशन,बॅक असल्याने बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठी आहे . भविष्यात या रोडवरुन वाहानाची संख्या वाढल्या नंतर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावातील बस स्थानक जवळील रोडचे काम नियमानुसार करून घ्यावे , जेवढी लांबी आहे तेवढा रोड करावा.
सदरील काम करणाऱ्या ठेकेदाराला वेळोवेळी सांगून सुध्दा गावातील बस स्थानक जवळील रोडचे काम कमी होत असुन ते दिलेल्या नियमानुसार रोडचे काम चांगल्या दर्जाचे काम सुचना द्यावी असे जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात सरपंच श्रीमती गयाबाई शंकरराव घोरबांड यांनी म्हटले आहे.