नांदेड/हदगाव| हदगाव तालुक्यातील तामसा सर्कलच्या मौजे वारकवाडी (मांडावा) हद्दीत गावठी, देशी व विदेशी दारू विक्रीचा अवैध्य कारभार जोरात सुरु आहे. हा कारभार बंद करावा या मागणीसाठी गेली ४ वर्षांपासून गावकरी पाठपुरावा करत आहेत. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने गावातील तरुण व प्रॉढ व्यक्ती दारूच्या हरी जाऊन आपले संसार उद्धवस्त करून घेत आहेत. हा प्रकार थांबविण्यासाठी तात्काळ तामसा हद्दीत गावठी, देशी व विदेशी दारू विक्रीचा अवैध्य कारभार बंद कराव अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड याना निवेदन देऊन गावकर्यांनी केली आहे.
दि.०८ नोव्हेंबर २०१८ रोजी वारकवाडी (मांडावा) येथे ग्रामसभा घेण्यात आली होती. ग्रामसभेमध्ये गावकरी संडळी व काही प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीत गावातील देशी -विदेशी व गावठी दारू ही अवैधरित्या मोठ्या विक्री होत असून, गावातील तरुण व प्रॉढ व्यक्ती व्यसनाधीन होत चाललेले आहे. या दारूपायी काही लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. महत्त्वाची बाब अशी की तरुन मुले या व्यसनापायी मृत्यु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावातील अवैद्य दारू विक्री बंद करण्यात यावी असा ठराव घेतला होता.
यावेळी गावातील सर्व गावकरी व प्रतिष्ठित नागरीक, महिला मंडळ यांनी ग्रामसभेमध्ये देशी विदेशी व गावठी दारू (सर्व प्रकारच्या व्यसनी) अवैध रीतीने विक्री होत आहे. म्हणून संबंधीत ठाणेदार यांना या प्रकरणात योग्य कार्यवाही करून आम्हा गावकऱ्यास न्याय देण्याची मागणी केली होती. गेल्या ४ वर्षात या प्रकरणाचा पाठपुरावा गावकरी करत आहोत. परंतु याची कोणीही दखल घेत नाहीत त्यामुळे अल्पवयीन बालके व मजुरदार नागरिक या व्यसनाच्या आहारी जाऊन आपले संसार उध्वस्त करून घेत आहेत. किमान आतातरी पोलीस प्रशासनाने गावकर्यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन हे दारू विक्रीचे अवैद्य धंदे बंद करावे. अशी मागणी दि.०९ ऑकटोबर रोजी निवेदन देऊन करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधिक्षक , नांदेड (राज्य उत्पादन शुल्क), उप विभागीय पोलीस अधिकारी, भोकर याना देण्यात आले आहे. या निवेदनावर वारकवाडी (मांडावा), कोंडूर, हाळेगाव, वानवाडी, खारटवाडी, लोहा पाटी, आदी गावच्या लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.