‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये एकता दिनानिमित्त कुलगुरूंनी दिली शपथ - NNL


नांदेड|
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. ३१ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते या दोन महान व्यक्तीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकता दिवस व ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची आणि भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली.  

यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, मेजर शांतीनाथ बनसोडे, अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, डॉ. अजय टेंगसे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, डॉ. सरिता यन्नावार, रामदास पेदेवाड, लक्ष्मीकांत आगलावे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी