हिमायतनगर| ऐन दिवाळीच्या काळात हिमायतनगर शहरातील वॉर्ड क्रमांक १ मधील नागरिक पाणी टंचाईने हैराण झाले आहेत. शंकर नगर भागातील सार्वजनिक विहिरीवरील मोटार पंप जळाल्याने गेल्या ८ दिवसापासून नागरिक पिन्याच्या पाण्यासाठी भटकन्ती करत आहेत.
याबाबत नगरपंचायतीला सूचना दिल्या मात्र नगरपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे वरून राजाच्या सरी सुरु असताना केवळ नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना दिवाळीच्या पर्वकाळात पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आल्याची येथल्या नागरिकांनी सांगितले आहे. नागरिकांची पाण्यासाठी होणारी परवड थांबविण्यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यानी तात्काळ येथे नवीन मोटारपंप बसून नागरिकांची होणारी समस्या सोडवावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.