मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोटातून जीवे मारण्याची धमकी -

जीवे मारण्याचाही कट 

मुंबई।
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. तेव्हापासून एकनाथ शिंदे हे चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

महिनाभरापूर्वीच मुख्य्मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील धमकीचा आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता त्यानंतर गुप्तचर विभागानेच याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी माओवाद्यांनी दिली होती.

आमच्या दलमच्या अनेक साथीदारांना तुम्ही आल्यापासून शहीद व्हावं लागलं. त्याचा बदला आम्ही लवकरच घेऊ,” असे धमकीवजा पत्र सीपीआय (माओवादी) या नावाने ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहचल्याची माहिती देण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीत काम सुरू केल्यापासून आमचा पैसा बंद झाला असेही या पत्रात नमूद होते व याचे चोख उत्तर दिले जाईल असे म्हणत शिंदें व त्यांच्या परिवाराला याची पूर्ण किंमत चुकवावी लागेल,” अशी धमकी पत्रात देण्यात आली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी