अपघातात तीन दुचाकीचे नुकसान
अर्धापुर, निळकंठ मदने| तालुक्यातील पार्डी देळूब बु.कडून पार्डी म.कडे येणाऱ्या ट्रॅक सरंक्षक भिंत तोडून घरात घुसला. यात एक तरुणी जागीच ठार झाल्याची घटना दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. कु.वर्षा माणिक मदने असे मयत तरुणीचे नाव आहे.
तालुक्यातील पार्डी म. येथे क्रमांक एम.एच.- २६ / बी.इ.- ९१९३ संरक्षण भिंत तोडून घरात देळूब रोड वरील घरात घुसला आहे. देळूब कडून येणारा ट्रॅक सर्वप्रथम त्यांनी दुचाकी क्रमांक एम.एच.- २६. बी.बी.- ७६३६ ला धडक दिली. या अपघातात दुचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आहे. त्यांनतर ट्रॅक घरात घुसला तेंव्हा वर्षा मदने ही सकाळी मुख मार्जन करत होत्या. अचानक ट्रॅक घरात घुसला तेव्हा तरुणीला बचावाचा वेळच भेटला नाही. यात तरुणी ट्रॅकच्या खाली आली, यातच तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅक तरुणीला चिरडून घरात ठेवलेल्या दोन दुचाकीलाही धडक दिली. यात दुचाकी क्रमांक एम.एच-२६, ए.झेड.- ३२०८ व दुचाकी क्रमांक एम .एच - २६- वाय-३४७९ या दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासह पोलिसांनी भेट दिली आहे. तसेच चालक व त्यांच्या सहाय्यकाला ताब्यात पोलीसानी घेतले आहे.
वर्षा मदने होती उच्च शिक्षित - अर्धापुर तालुक्यातील पार्डी म.येथील घरात ट्रॅक घुसून उच्चशिक्षित तरुणी ठार झाल्याची घटना घडल्याने पार्डी गावात शोकावळा पसरली आहे. कु.वर्षा मदने ही अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांनी होती. ही पाचवी वर्गापासून बिलोली तालुक्यातील शंकर नगर येथील नवोदय विद्यालयात बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने बी. एस.सी.ला प्रवेश घेतला. शिक्षण घेत असताना लहान मुलांचे वर्गही घेत होती. मागील दि.२४ सप्टेंबर रोजी एका खाजगी पतसंस्थेत मुलाखत दिली होती. तर उद्या लेखी परीक्षासाठी बोलावले होते. अश्या होतकरू तरुणीचा अपघाती मृत्यू होणे आई वडीलांना धक्काच बसला आहे. तिच्या पश्चात आई - वडील ,एक भाऊ ,तीन बहीण अशा परिवार आहे.
अर्धापुर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयात वर्षा मदने ही महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती,तिने नांदेड़ विद्यापीठाचे नेतत्व करीत ओरीसा मध्ये गोल्डमिड्यालिस्ट प्राप्त केले होते.तिचे योगामध्ये मोठे योगदान होते, तिच्या मृत्यू ची बातमी कळताच महाविद्यालयात तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून विद्यालयाला सुटी जाहीर केली.